Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘कर्णधार म्हणून पॉंटिंगपेक्षा माहीच उजवा’; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने मान्य केले धोनीचे मोठेपण

December 20, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


क्रिकेटविश्वात नेहमीच दोन खेळाडूंची तुलना होत असते. फलंदाजीचा विचार केल्यास समकालीन असलेले सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्या दरम्यान सर्वश्रेष्ठ कोण? असा प्रश्न अजूनही विचारला जातो. त्यातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कोण? या प्रश्नावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉग याने आपले मत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या पारड्यात टाकले आहे.

चायनामन फिरकीपटू म्हणून नाव कमावलेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग हा सातत्याने क्रिकेटविश्वात घडणाऱ्या घडामोडींवर आपले मत व्यक्त करत असतो. आपल्या युट्युब चॅनलवर तो या प्रतिक्रिया देताना दिसतो. नुकतेच त्याने आपल्या कार्यक्रमात बोलताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार कोण याबाबत आपले मत सांगितले. हॉग म्हणाला,

“मला वाटते की एमएस धोनी आणि रिकी पॉंटिंग या दोघांचाही क्रिकेट इतिहासातील महान कर्णधारांमध्ये समावेश होतो. त्यांनी आपल्या देशाला अनेक मोठे क्षण दाखवले आहेत. त्यांनी केलेली कामगिरीही चकित करणारी आहे. मात्र, माझ्या मते धोनी हा पॉंटिंगपेक्षा किंचितसा सरस आहे.”

रिकी पॉंटिंग याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने दोन वेळा वनडे विश्वचषक आपल्या नावे केला होता. विशेष म्हणजे या दोन्ही वेळी हॉगचा संघात समावेश केला गेलेला. तसेच पॉंटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया अनेक वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानी विराजमान होता. दुसरीकडे धोनी याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार म्हणून गौरवले जाते. त्याच्या नेतृत्वात भारताने सर्व आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केलेल्या. तसेच, चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या नेतृत्वात चार वेळा जगातील सर्वात मोठी टी20 लीग आयपीएल जिंकलेली आहे.

(Brad Hogg Said MS Dhoni Ahead Ponting In Captaincy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नाचक्की! ब्रिस्बेन कसोटी जिंकूनही व्हावे लागले अपमानित; वाचा संपूर्ण प्रकरण
बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नला वाहिली जाणार खास श्रद्धांजली; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले नियोजन


Next Post
Arjun Tendulkar

अर्जुन नक्कीच यशस्वी क्रिकेटपटू होणार! सचिनच्याच शिष्याने व्यक्त केला विश्वास

Rohit Shamra smashing six

अरे यार! तब्बल 9 वर्षापासून रोहित करत आलेल्या लाजवाब कामगिरीत पडला खंड

Shikhar dhawan gym video

करा कष्ट, राहा धष्टपुष्ट! शिखर धवनचा जिममधील व्हिडिओ व्हायरल, संघात पुनरागमनाची अपेक्षा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143