आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. इथे खेळाडूंना बक्कळ पैसा मिळतो. आज आपण कोणता संघ किती श्रीमंत आहे ते पाहणार आहोत.
आयपीएलमधील चार वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची ब्रँड व्हॅलू सर्वाधिक 809 कोटी रुपये आहे. परंतु संघांमध्ये खेळणार्या खेळाडूंचे एकूण मूल्य पाहता या हंगामात सर्वात महागडा संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे. सीएसकेच्या खेळाडूंची एकूण किंमत 84.85 कोटी आहे. दुसर्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स संघ आहेत. संघाच्या खेळाडूंची एकूण किंमत 83.05 कोटी रुपये आहे. सर्वात स्वस्त संघ किंग्ज इलेव्हन पंजाब असून संघाची एकूण किंमत 69.1 कोटी रुपये आहे.
आयपीएलमध्ये मिळालेल्या किमतीनुसार (रुपयांमध्ये) खेळाडूंची यादी:
विराट कोहली (आरसीबी) – 17 कोटी
पॅट कमिन्स (केकेआर) – 15.50 कोटी
ऋषभ पंत (दिल्ली डेअरडेविल्स) – 15 कोटी
रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) – 15 कोटी
एमएस धोनी (सीएसके) – 15 कोटी
बेन स्टोक ( राजस्थान रॉयल्स) – 12.50 कोटी
स्टिव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स) – 12.50 कोटी
डेव्हिड वॉर्नर (राजस्थान रॉयल्स) – 12.50 कोटी
सुनील नारायण (केकेआर) – 12.50 कोटी
संघातील एकूण खेळाडूंची संख्या ज्यांची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे:
किंग्ज इलेव्हन पंजाब – 12
राजस्थान रॉयल्स – 10
कोलकत्ता नाईट रायडर्स – 9
मुंबई इंडियन्स – 9
चेन्नई सुपर किंग्ज – 8
दिल्ली कॅपिटल्स – 7
सनराईजर्स हैद्राबाद – 7
रॉयल चालेंजर्स बेंगलोर – 6
संघांची ब्रँड व्हॅल्यू (रुपयांमध्ये) :
मुंबई इंडियन्स – 809 कोटी
चेन्नई सुपर किंग्ज – 732 कोटी
कोलकाता नाईट रायडर्स – 629 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – 595 कोटी
सनरायजर्स हैदराबाद – 483 कोटी
दिल्ली कॅपिटल्स – 374 कोटी
किंग्ज इलेव्हन पंजाब – 358 कोटी
राजस्थान रॉयल्स – 271 कोटी
महत्त्वाच्या बातम्या-
-चक्क २० संघांकडून खेळलेला अष्टपैलू आज उतरणार चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात
-सीएसके विरुद्ध मुंबई ड्रीम ११: पहा टीममध्ये कोणाला मिळाली जागा
-काय सांगता! आजपर्यंत आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘हा’ गोलंदाज एकदाही करु शकला नाही बाद
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात अशी असेल रोहितची मुंबई इंडियन्स!
-‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात