---Advertisement---

‘भारत देश माझं दुसरं घर आहे, नागरिकांना तडफडताना पाहू शकत नाही,’ भारतीयांना मदत करण्यासाठी समोर आलाय ब्रेट ली

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 1:16 PM
---Advertisement---

भारतात कोरोना रुग्णसंख्या सध्या वेगाने वाढते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येत रोज भयावह प्रमाणात वाढ होते आहे. ही परिस्थिती पाहून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि सध्या कोलकाता नाईट रायडर्स कडून आयपीएलमध्ये खेळणारा पॅट कमिन्स याने भारताला तब्बल ५० हजार डॉलर्स मदत केली. त्याचाच आदर्श घेत आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने देखील मदतीचा हात पुढे केला आहे.

ब्रेट लीची एक बिटकॉईनची मदत
पॅट कमिन्सने पंतप्रधान मदत निधीला ५० हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास ३७ लाख रुपये दान केले आहेत. तसेच त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना देखील मदत करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत ब्रेट लीने देखील आता भारताला मदत केली आहे. ब्रेट लीने एक बिटकॉईनची मदत भारताला केली आहे. ज्याची भारतीय रुपयात सध्या किंमत तब्बल ४१ लाख १ हजार रुपये इतकी आहे.

ब्रेट लीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली. तो म्हणाला, “भारत देश माझ्यासाठी घरासारखा आहे. माझ्या कारकिर्दी दरम्यान आणि निवृत्ती दरम्यान मला जे प्रेम भारतातून मिळाले, त्याचे माझ्या हृदयात खास स्थान आहे. सध्या कोरोना महामारी दरम्यान भारतातील लोकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे, ते पाहून मला अतिशय दु:ख होते आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो की मी यात माझ्यापरीने काही मदत करू शकतो आहे.”

https://twitter.com/BrettLee_58/status/1387017917376516102?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1387017917376516102%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.punjabkesari.in%2Fsports%2Fnews%2Fbrett-lee-donated-1-bitcoin-to-help-india-will-be-shocked-to-know-the-price-1373816

ब्रेट लीची क्रिकेट कारकीर्द 
ब्रेट ली हा ऑस्ट्रेलियाचा एक महान वेगवान गोलंदाज होता. आपल्या कारकिर्दीत त्याने आपल्या वेगाच्या बळावर जगभरातील फलंदाजांमध्ये दहशत निर्माण केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाकडून ७६ कसोटी सामने खेळताना ३१० विकेट्स पटकावल्या होत्या. तर २२१ वनडे सामन्यांमध्ये खेळताना ३८० विकेट्स पटकावण्याचा कारनामा केला होता.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! एकाच महिन्यात आयसीसीने तिसरा क्रिकेटपटू केला बॅन, ‘या’ दिग्गजावर तब्बल ६ वर्षांचे प्रतिबंध

DCच्या गोलंदाजाकडून मोठी चूक झाली, नशीब पंचांनी फक्त वॉर्निंग दिली; नाहीतर पूर्ण संघाला…

यष्टीमागे समालोचन करण्यात रिषभ बनला मास्टर! लाईव्ह सामन्यात म्हटले असे काही की समालोचकही हसून लोटपोट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---