---Advertisement---

WTC फायनल: पहिल्या षटकानंतर बुमराहला बदलावी लागली जर्सी, हे होते कारण

On: मंगळवार, जून 22, 2021 7:01 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा मंगळवारी (२२ जून) हापाचवा दिवस असून, या अखेरच्या दिवसाच्या खेळाला पावसामुळे साधारण १ तास उशीराने म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजता सामना सुरुवात झाली. मात्र, या अखेरच्या दिवशी पहिल्या षटकादरम्यानच भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यासोबत एक मजेदार घटना घडली.

बुमराहसोबत घडली ही घटना
या ऐतिहासिक कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पहिल्या चार पैकी दोन दिवस एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. सामन्याच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंडचा डाव २ बाद १०१ या धावसंख्येवरून पुढे सुरू झाला. न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सन व रॉस टेलर हे मैदानात उतरले.

https://twitter.com/omrajguru/status/1407298595296927744

पाचव्या दिवसातील पहिले षटकक टाकण्यासाठी भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाचारण करण्यात आले. मात्र, हे षटक टाकताना बुमराह इतर भारतीय खेळाडूंपेक्षा वेगळा जाणवत होता. बुमराह इतर खेळाडूंपेक्षा वेगळी जर्सी घालून मैदानात उतरला.

बुमराहने नियमितपणे कसोटी सामन्यासाठी वापरण्यात येणारी भारतीय जर्सी घातली होती, जिच्या समोरील बाजूस मुख्य प्रायोजक कंपनीचे नाव लिहिले होते. चार चेंडूनंतर ही चुक त्याच्या लक्षात आली मात्र त्याने हे पहिले षटक चालू ठेवले. त्यानंतर, दुसऱ्या षटकावेळी पटकन ड्रेसिंग रूममध्ये जाऊन तो या सामन्यासाठीची अधिकृत जर्सी घालून मैदानात परतला.

काय आहे आयसीसीचा नियम
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार, आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या कंपनीचा लोगो जर्सीच्या पुढील बाजूस लावून मैदानात उतरता येत नाही. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जर्सीच्या समोरील बाजूस नेहमी देशाचे नाव ठळक अक्षरात लिहिलेले असते. प्रायोजकांची नावे ही खांद्यावर लिहिलेली असतात. इतर वेळी, द्विपक्षीय मालिकांदरम्यान प्रत्येक संघ आपापल्या मुख्य प्रायोजकाचे नाव आपल्या जर्सीच्या दर्शनी भागावर लिहू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोनाल्डोने कोको-कोलाच्या बॉटल हटवल्याच्या व्हिडिओवर करिना कपूरची ‘भन्नाट’ रिऍक्शन

स्टायलिश कॅप्टन कूल! पाहा धोनीच्या दहा हटके हेअरस्टाईल

“माझ्या स्वभावातली ‘ही’ गोष्ट बदलली नसती तर आज मी इथे नसतो”, बुमराहने केला उलगडा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---