---Advertisement---

बुमराहची पत्नी संजनाच्या मेहंदीमध्ये २०१९ विश्वचषकाचा लोगो, चाहत्यांमध्ये रंगतेय ‘ही’ चर्चा

On: गुरूवार, मार्च 18, 2021 1:15 AM
---Advertisement---

मागील काही महिन्यात भारताचे अनेक क्रिकेटपटू लग्नाच्या बेडीत अडकले. यात नुकतेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समोवेश झाला आहे. बुमराहने सोमवारी (१५ मार्च) पेशाने स्पोर्ट्स अँकर असलेल्या संजना गणेशन हिच्याशी गोव्यामध्ये लग्न केले आहे. आता त्यांच्या विवाहसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

बुमरहाने लग्नासाठी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. तसेच त्याला इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टी२० मालिकेतूनही विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे तो लग्न करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर बुमराह आणि संजनाने सोमवारी सोशल मीडियावर त्यांच्या विवाहाची माहिती देत या चर्चांना पुर्णविराम दिला.

यानंतर गेल्या २ दिवसांत त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या फोटोमधून संजनाच्या हातावर काढलेल्या मेहंदीमध्ये २०१९ विश्वचषकाचा लोगो असल्याचे चाहत्यांनी हेरले. त्यामुळे अनेक चर्चांना सुरुवात झाली. अनेक चाहत्यांनी असा कयास लावला आहे की बुमराह आणि संजना यांच्यातील लव्हस्टोरी २०१९ विश्वचषकादरम्यान सुरु झाली असावी. म्हणूनच संजनाने विश्वचषकाचा लोगो मेहंदीमध्ये काढला आहे.

संजनाने २०१९ विश्वचषकादरम्यान केले होते अँकरिंग 

संजना गेल्या काही वर्षापासून स्टार स्पोर्ट्स या चॅनेलशी जोडलेली आहे. त्यामुळे ती भारताच्या अनेक सामन्यांदरम्यानच्या शोमध्ये अँकर म्हणून दिसते. तिने २०१९ विश्वचषकादरम्यानही अँकरींग केले होते. त्यामुळे त्यावेळी बुमराह आणि तिच्यामध्ये लव्हस्टोरी सुरु झाली असल्याची शक्यता आहे.

https://twitter.com/criccrazyshreya/status/1371850459695222798

https://twitter.com/duvidhaa/status/1371885733460340741

https://www.instagram.com/p/CMh6UtkJ43d/

बुमराहची मुलाखत घेतानाचा व्हिडिओ व्हायरल 

बुमराह आणि संजनाच्या लग्नानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बीसीसीआयने २०२० मध्ये आयोजित केलेल्या एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ आहे. बुमराहला त्यावेळी २ मोठे पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे संजना अँकरच्या भूमिकेत बुमराहला पुरस्कार जिंकल्यानंतरचा त्याचा अनुभव विचारत होती. यावेळी बुमराह हसून उत्तरे देताना दिसत होता.

https://twitter.com/Enchante__18/status/1366839356577566721

आयपीएलमधून बुमराह करु शकतो क्रिकेटमध्ये पुनरागमन

बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या अगामी वनडे मालिकेसाठीही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तो इंडियन प्रीमीयर लीगच्या चौदाव्या हंगामात खेळतानाच चाहत्यांना दिसू शकतो. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय गोलंदाजावर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे वडीलांचे निधन

‘सुरुवात कोरोला तर शेवट फेरारीसारखा’, विराटसाठी कार्तिकने केलेल्या अनोख्या ट्विटवर चाहत्यांच्या ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज: इंडिया लिजेंड्सचा फायनलमध्ये प्रवेश; अटीतटीच्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिज पराभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---