विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात धमाकेदार करणाऱ्या भारतीय संघाला स्पर्धेचा शेवट गोड करता आला नाही. भारतीय संघ रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला. हा ऑस्ट्रेलियाचा 6वा विश्वचषक किताब ठरला. दुसरीकडे, भारताचे 12 वर्षांनंतर तिसरा विश्वचषक किताब जिंकण्याचे स्वप्न तुटले. विशेष म्हणजे, टीम इंडिया वर्ल्डकप 2023 फायनल खेळण्यापूर्वी 10 सामन्यात अजिंक्य राहिली होती, पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. यानंतर खेळाडूंसह संपूर्ण देश दु:खात आहे. अशात आघाडीचे व्यावसायिक आनंद महिंद्रा यांचे विधान सर्वत्र चर्चेत आहे.
आनंद महिंद्रांनी वाढवला आत्मविश्वास
भारतीय संघाच्या पराभवानंतर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून (ट्वीट) खेळाडू आणि संघाचा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी यावेळी दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत निराश झालेल्या मोहम्मद सिराज (Jasprit Bumrah) याला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मिठी मारताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत त्यांनी ग्राफिक्स शेअर केले आहे. यामध्ये दिसते की, भारतीय संघाचा कोणता खेळाडू कोणत्या राज्यातील आहे.
आनंद महिंद्रांनी हे ट्वीट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “यावरून समजते की, आपण का हारलो नाहीत. संघांसाठी एकसोबत जल्लोष करणे सोपे आहे. एकमेकांना पाठिंबा देणे आणि त्यांच्या वेदना शेअर करणे कठीण आहे. भारतीय संघाचे खेळाडू देशभरातून आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडने आले आहेत. मात्र, त्यांनी एका कुटुंबाप्रमाणे खेळले आणि आपले मन जिंकले. ते अजूनही माझे मंडे मोटिवेशन आहेत.”
https://twitter.com/anandmahindra/status/1726459536360542505?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1726459536360542505%7Ctwgr%5Eb6968d2a0cf0c6b9aba1bdabd3e40f2af52e96d3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Ficc-world-cup%2Fnews%2Fanand-mahindra-statement-motivate-team-india-after-world-cup-2023-final-defeat%2Farticleshow%2F105349003.cms
भारताला 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा
भारतीय संघाला 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा आहे. भारताने अखेरची आयसीसी ट्रॉफी 2013मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात जिंकली होती. त्यानंतर भारताने प्रत्येक आयसीसी स्पर्धेच्या बादफेरीत प्रवेश केला, पण तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014च्या टी20 विश्वचषकासह भारत 2 आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही पराभूत झाला आहे. मात्र, यावेळी संघ वेगळ्या लयीत होता. संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मात्र, अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला ट्रॉफीच्या आशांवर पाणी फेरावे लागले. (businessman anand mahindra statement motivate team india after icc odi world cup 2023 final defeat)
हेही वाचा-
पराभवानंतर खचलेल्या भारताचा गंभीरने वाढवला कॉन्फिडन्स; ट्वीट करत म्हणाला, ‘मी आधीच म्हणालोय आपण…’
‘तुझं रडणं मनाला लागलं, पण तू…’, रोहितचा मान खाली घालून चालतानाचा व्हिडिओ पाहून हळहळला चाहता; पाहा