---Advertisement---

यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाबद्दल डेव्हिड वॉर्नरने केले मोठे भाष्य, म्हणाला…

On: शनिवार, मे 9, 2020 8:47 PM
---Advertisement---

जगभरातील अनेक देशांत सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे क्रीडा जगतही सध्या ठप्प आहे. काही क्रिकेट स्पर्धाही रद्द तर काही स्थगित करण्यात आले आहे. तसेच नजीकच्या भविष्यातील काही स्पर्धांच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह आहे. यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाचा देखील समावेश आहे.

या टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने देखील काळजी व्यक्त केली आहे. काल(८ मे) वॉर्नर आणि भारताचा रोहित शर्मा यांनी इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅटवर गप्पा मारल्या होत्या. या दरम्यान वॉर्नरही टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल काळजी व्यक्त केली.

तो म्हणाला, ‘सध्याची परिस्थिती पाहिली तर आयसीसी विश्वचषक इथे होणार नाही असे वाटत आहे. सर्वांना (१६ संघांना) एकत्र येणे कठीण वाटत आहे.’

पण अजूनही आयसीसीने या विश्वचषकाबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही.

याबरोबरच टी२० विश्वचषकाव्यतिरिक्त अन्य अनेक गोष्टींवरही रोहित आणि वॉर्नरने चर्चा केली. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळण्याबद्दल म्हणाला, त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला चांगले वाटते. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियालाच पराभूत करणे खास असते. असंच काहीसं वॉर्नरही बोलला. तो म्हणाला की, भारतात येऊन त्यांच्याविरुद्धच खेळायला मला खूप आवडते.

ट्रेंडिंग घडामोडी – 

बहिणीमुळे लहानपणी उजव्या हाताचे बोट कापावे लागले; तरी आज आहे जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज

कोरोना व्हायरसमुळे सगळ नष्ट झालं, आता चक्क तंबू टाकून राहतोय हा क्रिकेटर

टीम इंडियाचा गब्बर जेव्हा देतो सुरेश रैनाला सपोर्ट…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---