भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात गाबा येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने 4 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलिया संघावर मात करत मालिका आपल्या नावावर केली. या सामन्यात भारतीय संघाकडून शार्दूल ठाकूरने आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. यानंतर मायदेशी आल्यावर शार्दूल ठाकूर म्हणाला, त्याने मागील दोन वर्षात गोलंदाज ते अष्टपैलू वेगवान गोलंदाज खेळाडू असा प्रवास केला आहे.
शार्दूल ठाकूरने ऑस्ट्रेलियात गाबा येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात महत्त्वपूर्ण अशा 7 विकेट्स मिळवल्या. त्याचबरोबर जेव्हा पहिल्या डावात भारतीय संघाची 186 धावसंख्येवर 6 बाद अशी खराब कामगिरी झाली होती. तेव्हा फलंदाजीला येत सर्वात जास्त 67 धावांची खेळी करून भारतीय संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला. तसेच वॉशिंग्टन सुंदरसोबत सातव्या विकेटसाठी 123 धावांची अत्यंत आवश्यक भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला.
शार्दूल ठाकूरने 2018 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र त्या सामन्यात तो फक्त 10 चेंडू फेकू शकला होता. कारण त्याला या सामन्यात दुखापत झाली होती. त्याचबरोबर शार्दूल ठाकूर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला, “हो, मला अष्टपैलू गोलंदाज खेळाडू म्हणले जावू शकते. माझ्याकडे फलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि येथून पुढे ही भविष्यात जेव्हा ही मला फलंदाजी करण्याची संधी मिळेल, तेव्हा संघाच्या धावसंख्येत उपयुक्त असे योगदान देईल.”
शार्दूल ठाकूरकडे ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेण्याची संधी होती. त्याचबरोबर आपली कामगिरी अजून उंचावण्याची संधी होती. मात्र, त्याला तसे करता आले नाही. यावर त्याला विचारण्यात आल्यावर शार्दूल ठाकूर म्हणाला,”मला दुसर्या डावात 5 विकेट्स घेण्याची संधी होती आणि ती मी गमावली म्हणून मला कोणत्याही प्रकारची खंत नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की, जर मी 5 विकेट्स घेतल्या असत्या तर चांगले झाले असते. मात्र मला सिराजसाठी आनंद आहे. मी प्रार्थना केली होती की त्याला 5 विकेट्स मिळाव्या. कारण की तो अवघड परिस्थितीचा सामना करत होता.”
वडिलांचे निधन झाले तरी सिराजने भारतीय संघासोबत राहून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णय घेतला होता.
त्यामुळे शार्दूल ठाकूर म्हणाला,” ही मालिका त्याच्यासाठी भावनिक होती. नुकतेच त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याने सांगितले की त्याच्या वडिलांना वाटत होती की त्याने भारतीय संघासाठी खेळावे. ते भले ही या जगात आता नाहीत, परंतु त्यांनी वरुन बघितले असेल की आपल्या मुलाने 5 विकेट्स घेतल्या आहेत आणि खुश झाले असतील. यासाठी मी जेव्हा झेल घेतला, तेव्हा देवाचे आभार मानले कारण सिराजला 5 विकेट्स प्राप्त झाल्या. ”
महत्त्वाच्या बातम्या –
विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी
दिल्ली संघाने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झळकावले ‘त्याने’ शानदार शतक
ट्रिपल एच म्हणतोय, ‘…तर मी असतो दुसरा सचिन तेंडुलकर’