---Advertisement---

‘त्याला आयसीसीची परवानगी’, विराट, अश्विन अन् राहुलच्या स्टंप माइकमधील वक्तव्यावर ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टचे स्पष्टीकरण

On: शनिवार, जानेवारी 15, 2022 8:39 AM
drs-virat
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind test series) यांच्यातील केपटाऊन कसोटी सामना शुक्रवारी (१४ जानेवारी) संपला. सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ७ विकेट्सने विजय मिळवून मालिका नावावर केली. उभय संघातील हा तिसरा कसोटी सामना खूपच रोमांचक ठरला. सामन्यादरम्यान काही वाद देखील झाले. यापैकी ‘हॉक-आय’ विवाद जास्त चर्चेचा विषय ठरला, ज्यामुळे भारतीय संघाच्या विरोधात एक निर्णय दिला गेला होता. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीसह संघातील इतर खेळाडू चिडल्याचे पाहायला मिळाले होते. आता याच पार्श्वभूमीवर ब्रॉडकास्टर्स सुपरस्पोर्टने स्पष्टीरकरण दिले आहे.

केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात कर्णधार डीन एल्गरसाठी भारताकडून पायचीतसाठी अपील करण्यात आले होते, यावर पंचांनी त्याला बाद घोषित केले होते. परंतु, एल्गरने पंचांच्या या निर्णयानंतर डीआरएस रिव्यू घेण्याचे ठरवले. यानंतर हॉक-आय तंत्रज्ञानाच्या मदतीने पाहिल्यावर असे समोर आले की, चेंडू स्टंपच्यावरून जात होता. यानंतर पंचांसह सर्वजण हैराण झाल्याचे पाहायला मिळाले.

या निर्णयानंतर विराटसह रविचंद्रन अश्विन आणि केएल राहुल यांनी स्टंप माइकमध्ये जावून सामन्याचे ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टच्या विरोधात वक्तव्य केले होते.

हॉक-आय तंत्रज्ञानाशी आमचा संबंध नाही – सुपरस्पोर्ट
आता सुपरस्पोर्टकडून याविषयी स्पष्टीकरण दिले गेले आहे की, हॉक-आय कॅमेरा आणि त्यांचा कसलाच संबंध नाही. एका वृत्तमाध्यमाशी बोलताना सुपरस्पोर्टकडून सांगण्यात आले की, “सुपरस्टोर्टने भारतीय संघातील काही सदस्यांकडून केली गेलेली वक्तव्ये पाहिली. हॉक-आय एक स्वतंत्र सेवा प्रदाता आहे, ज्याला आयसीसीची परवानगी आहे आणि त्यांच्या तंत्रज्ञानाला अनेक वर्षांपासून डीआरएसचा भाग म्हणून स्वीकारले गेले आहे. सुपरस्पोर्टचे हॉक-आय तंत्रज्ञानावर कसलेच नियंत्रण नाही.”

भारतीय खेळाडूंनी साधला होता निशाणा
एल्गरच्या डीआरएसच्या निर्णयामुळे जे घडले, त्यानंतर कर्णधार विराटने जाणूनबुजून स्टंप माइकच्या जवळ जाऊन  सुपरस्पोर्टविषयी वक्तव्य केले होते. विराट म्हणाला होता की, त्यांनी फक्त दुसऱ्या संघातील खेळाडूंवर पकडण्याचा प्रयत्न न करता, स्वतःच्या संघातील खेळाडूंकडे देखील लक्ष ठेवले पाहिजे, तर अश्विन ब्रॉडकास्टरचे थेट नाव घेत म्हटला होती की, सुपस्पोर्टने जिंकण्यासाठी दुसरी एखादी पद्धत शोधली पाहिजे. तसेच केएल राहुल स्टंपमध्ये येऊन म्हटलेला की, ११ खेळाडूंच्या विरोधात पूर्ण देश भिडत आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ चार कारणांनी फत्ते होऊ शकली नाही दक्षिण आफ्रिका मोहिम

असा असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पुढील प्रवास; अंतिम फेरीची अजूनही आस

जयपूरचा पटनाला दणका! वेगवान सामन्यात बेंगलोरने गुजरातला रोखले

व्हिडिओ पाहा –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---