शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईला १० विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर धोनीला साखळी फेरीतील चेन्नईच्या उर्वरित ३ सामन्यातील त्याच्या खेळण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नावर उत्तर देताना धोनी म्हणाला, ‘कर्णधार पळून जावू शकत नाही. यामुळे मी नक्कीच राहिलेले ३ सामने खेळणार आहे.’
उर्वरित ३ सामन्यात प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करु – एमएस धोनी
त्याआधी पराभवाबद्दल बोलताना धोनी म्हणाला, ‘नक्कीच वाईट वाटते. आम्हाला काय चूकले हे पाहावे लागेल. हे वर्ष आमचे नव्हते. यावर्षी आम्ही केवळ १ किंवा २ सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी असे दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. तूम्ही १० विकेट्सने पराभूत झाला काय किंवा ८ विकेट्सने पराभूत झाला काय, त्याने कोणताही फरक पडत नाही. सर्वच खेळाडूंना वाईट वाटले आहे. पण ते त्यांचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत. नेहमीच सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. आशा आहे की उर्वरित ३ सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु.’
याबरोबरच धोनी असेही म्हणाला की आम्हाला आशा आहे निदान पुढील ३ सामन्यात तरी आम्ही आमची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करु.
चेन्नईचा संघ मुंबईसमोर ठरला निष्प्रभ
या सामन्यात चेन्नईची फलंदाजी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. चेन्नईची आवस्था एकेवेळी ३ धावांच ४ बाद अशी होती. पण नंतर सॅम करनने ५२ धावांची खेळी करत चेन्नईला सन्मानजनक ११४ धावसंख्या उभारुन देण्यात मोलाचा वाटा उचलला. मुंबईकडून ट्रेंड बोल्टने सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करताना १८ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
११५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून सलामीला आलेल्या इशान किशनने नाबाद ६८ धावा केल्या, तर क्विंटॉन डिकॉकने नाबाद ४६ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने हे आव्हान एकही विकेट न गमावता १२.२ षटकात पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी फाटके शूज घालून गोलंदाजी करणारा ‘तो’ आता ठरलाय आयपीएलचा चमकता सितारा
भाऊच भावाला नडला! खेळायचा होता मोठा फटका, पण झाला यष्टीचीत
धावा करण्यात मागे पडलेली सीएसके विक्रमांत मात्र आघाडीवर, पाहा काय केलाय विक्रम
ट्रेंडिंग लेख –
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!