संयुक्त अरब अमिराती येथील अबु धाबी शहरात सध्या टी१० लीग सुरू आहे. या लीगमधील सातवा सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) दिल्ली बुल्स विरुद्ध चेन्नई ब्रेव्स संघांमध्ये पार पडला. ड्वेन ब्रावोच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली बुल्स संघाने ५ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला. या सामन्यादरम्यान एक विचित्र असा प्रसंग घडला आहे. दिल्ली बुल्सचे नेतृत्त्वपद सांभाळत असलेल्या ड्वेन ब्रावोला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे, याची संपूर्ण माहिती नसल्याचे दिसले.
दिल्ली बुल्सचा कर्णधार ब्रावो आणि चेन्नई ब्रेव्सचा कर्णधार दसुन शनाका यांच्यात सामन्यापूर्वी नाणेफेक झाली. नाणेफेक झाल्यानंतर दिल्ली बुल्सची अंतिम एकादश सांगताना ब्रावो म्हणाला की, या सामन्यात अष्टपैलू रोमरियो शेफर्डला विश्रांती दिली आहे आणि त्याच्याजागी डॉमिनिक ड्रेक्सला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली आहे. परंतु दिल्ली बुल्स संघाकडून मिळालेल्या प्लेइंग इलेव्हनच्या यादीत ड्रेक्सच्या जागी शेफर्डचे नाव लिहिले होते.
नाणेफेकीवेळी ही चूक कोणाच्याही लक्षात आली नाही. सामना सुरू झाल्यानंतर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीसाठी दिल्ली बुल्स संघ मैदानावर आला होता. यावेळी दिल्लीचा संघ पहिले षटक टाकत असताना प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार शनाका याला ब्रावोच्या चूकीची जाणीव झाली. परंतु शनाकाने यावर कसलीही तक्रार केली नाही. त्यामुळे शेफर्डने पूर्ण सामना खेळला आणि आपल्या १.४ षटकांच्या स्पेलमध्ये १६ धावा देत १ विकेटही घेतली. क्रिकेटच्या मैदानावर फार क्वचित अशा चूका पाहावयास मिळत असतात.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, चेन्नई ब्रेव्सने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात १२४ धावा केल्या होत्या. भानुका राजपक्षच्या ३१ चेंडूतील नाबाद ६४ धावा आणि मार्क दयालच्या २९ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने या धावा केल्या होत्या. दिल्ली बुल्सला या डावात फक्त २ विकेट्स घेण्यात यश आले होते.
प्रत्युत्तरादाखल दिल्ली बुल्सकडून कर्णधार ब्रावोने शेवटी फलंदाजीला येत १७ चेंडूत ४३ धावांची झंझावाती खेळी खेळली आणि संघाला ९.४ षटकातच विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ पाच कारणांमुळे न्यूझीलंड संघ भारतासमोर झुकला, सलामीवीरांनी पार पाडली महत्वाची भूमिका
लेकाची काळजी! शोएब मलिकची मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे टी२० मालिकेतून तडकाफडकी माघार