आयपीएल २०२४ मधील पाचवा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होत आहे. या सामन्यात शुबमन गिल गुजरात टायटन्सचे नेतृत्व करतोय तर मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. तर या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या आहेत.
याबरोबरच, नरेंद्र मोदी स्टेडियमवरती शेवटच्या षटकात हार्दिक पांड्या क्षेत्ररक्षण लावत असताना रोहित शर्माला पळवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे रोहितचे चाहते चांगलेच संतापले आहेत. तसेच हा प्रकार चालू सामन्यात मुंबई इंडियन्स संघ क्षेत्ररक्षण करत घडला आहे.
Best video of the day Hardik shouting on Rohit 😭https://t.co/5DFFnAfdmG
— ANSH. (@KohliPeak) March 24, 2024
दरम्यान, रोहित शर्मा 30 यार्डच्या आतही मैदानात उतरल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे, परंतु या सामन्यात हार्दिकने त्याला सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी ज्या पद्धतीने पाठवले ते चाहत्यांना आवडले नाही. आता पुन्हा एकदा युजर्सनी हार्दिकला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या. तर साई सुदर्शनने 45 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता या मोसमातील पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला 169 धावांची गरज आहे. याबरोबरच रोहित शर्मावर देखील फलंदाजी करताना सर्वांच्या नजरा असणार आहेत.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-
मुंबई इंडियन्स प्लेइंग 11- हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह ,ल्यूक वुड.
गुजरात टायटन्स प्लेइंग 11- शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.
महत्त्वाच्या बातम्या-
- बुमराहचा भेदक मारा, अन् हंगामातील पहिला सामना जिंकण्यासाठी मुंबईपुढे 169 धावांचे आव्हान
- आरसीबी समोर पंजाबचं आव्हान! पाहा दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी