भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 जानेवारी) लखनऊ येथे खेळला गेला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने एक चेंडू व 6 गडी राखून रोमांचक विजय मिळवला. भारताच्या विजयामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. मात्र, या सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या हा कमालीचा निराश दिसला.
उभय संघातील पहिला सामना रांची येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाला 176 धावांचा पाठलाग करण्यात अपयश आलेले. त्या सामन्यात फिरकी गोलंदाजांचे चांगलेच वर्चस्व राहिलेले. त्यानंतर लखनऊ येथील दुसऱ्या सामन्यात त्यापेक्षा अधिक चेंडू फिरकी घेताना दिसला. संपूर्ण सामन्यात टाकल्या गेलेल्या 239 चेंडूंपैकी 179 चेंडू फिरकीपटूंनी टाकले. फिरकी गोलंदाजांना मदतगार व फलंदाजांना कठीण जाणाऱ्या या खेळपट्टीमुळे हार्दिकने आपली निराशा व्यक्त केली.
सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना तो म्हणाला,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास ही खरेच एक धक्कादायक आणि चकित करणारी खेळपट्टी होती. दोन्ही सामने आम्ही अशाच खेळपट्ट्यांवर खेळले. अवघड खेळपट्टीवर खेळण्यास कोणालाही समस्या नव्हती. मात्र, टी20 क्रिकेटमध्ये अशी खेळपट्टी देणे योग्य ठरत नाही.”
या सामन्याचा विचार केल्यास न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी बळी मिळवत न्यूझीलंडला 99 धावांवर रोखले. न्यूझीलंडसाठी कर्णधार सॅंटनरने सर्वाधिक 19 धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना भारत सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र, सॅंटनरच्या कुशल नेतृत्वाने त्यांनी भारतीय संघाला अखेरच्या क्षणापर्यंत झुंजवले. सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांनी चिवट फलंदाजी करताना संघाला एक चेंडू राखून विजय मिळवून दिला. नाबाद खेळी करणारा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला.
(Captain Hardik Pandya Unhappy With Pitches Provide In Lucknow T20I Against Newzealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 100 धावांसाठी न्यूझीलंडने रडविले! 1 चेंडू राखून भारताचा विजय
“पुढच्या महिन्यात दुसरा वर्ल्डकप जिंकायचाय”, शफालीने व्यक्त केला आत्मविश्वास
BIG BREAKING! पोरींनी रचला इतिहास, U19 टी20 विश्वचषकावर भारताने कोरले नाव