टी20 विश्वचषक 2022मधील भारतीय संघाचा दुसरा सामना गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध झाला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 56 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांना चोप देत समाधानकारक धावसंख्या उभारली आणि क्षेत्ररक्षणावेळी याच धावसंख्येचा बचावही केला. यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने खास कारनामा करून दाखवला. यामध्ये त्याने विराट कोहली यालाही मागे टाकले आहे.
झाले असे की, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावत 179 धावा चोपल्या. या धावा करताना भारताकडून रोहितने डावातील पहिले अर्धशतक साजरे केले. त्याने 39 चेंडूत 53 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 4 चौकारही मारले. यासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. रोहित आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये विजय मिळवताना 3000 धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे.
50-run partnership comes up between @ImRo45 & @imVkohli 🙌🙌
After 10 overs, #TeamIndia are 67/1
Live – https://t.co/Zmq1aoK16Q #INDvNED #T20WorldCup pic.twitter.com/kZJyhXAOPZ
— BCCI (@BCCI) October 27, 2022
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये विजय मिळवताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दमदार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने आतापर्यंत भारताने मिळवलेल्या टी20 विजयात 2709 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आहे. बाबरने पाकिस्तानच्या टी20 विजयात 2265 धावा चोपल्या आहेत. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गप्टिल आहे. गप्टिलने न्यूझीलंडच्या टी20 विजयात 2222 धावा केल्या आहेत.
टी20 सामन्यात विजय मिळवताना सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
3022 धावा- रोहित शर्मा*
2709 धावा- विराट कोहली
2265 धावा- बाबर आझम
2222 धावा- मार्टिन गप्टिल
सामन्याचा आढावा
या सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सला 180 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाला निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या. त्यामुळे या सामन्यावर त्यांना पाणी सोडावे लागले. अशाप्रकारे हा सामना भारताने 56 धावांनी जिंकत विश्वचषकातील आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद वसीम टी-20 विश्वचषकातील त्याच्या पहिल्याच सामन्यात जिंकले मन, केली पाहण्यासारखी गोलंदाजी
आयपीएल 2023 पूर्वी दिल्ली कॅपिटल्स ‘या’ त्रिमूर्तीला देणार नारळ? 10 कोटींच्या खेळाडूलाही मिळू शकतो डच्चू