---Advertisement---

Video: पहिला वनडे सामना सोडून मेव्हण्याच्या लग्नात रोहितने लावले ठुमके, पत्नी रितिकानेही दिली साथ

On: शुक्रवार, मार्च 17, 2023 2:46 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला वनडे सामना वानखेडे स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 17 मार्च) रंगला. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. कारण, रोहित शर्मा याने त्याच्या मेव्हण्याच्या लग्नासाठी सुटी घेतली होती. अशात रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी लग्नात जोरदार डान्स केला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरादर व्हायरल होत आहे.

रोहितने पत्नीसोबत लावले ठुमके
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिच्यासोबत डान्स फ्लोरवर जोरदार ठुमके लावले. यावेळी रोहितने काळ्या रंगाची शेरवाणी परिधान केली होती. त्याने एका पंजाबी गाण्यावर शानदार डान्स केला. रोहितला रितिकानेही साथ दिली. दोघांनीही शानदार ठुमके लावले. दोघांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मैफील लुटतोय. आता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

खरं तर, रोहित शर्मा याने मेहुणा कुणाल सजदेह (Kunal Sajdeh) याच्या लग्नात पोहोचला. त्यामुळे त्याला वनडे सामन्यात हजेरी लावता आली नाही. आता कर्णधाराचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वी रितिकाने तिच्या भावाच्या हळदी समारंभातील सुंदर फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

कोण आहे रोहितचा मेहुणा?
कुणाल सजदेह हा रितिका सजदेह हिचा भाऊ आणि क्रिकेटपटू रोहित शर्माचा मेहुणा आहे. तो सध्या मॅनचेस्टर येथे डेलॉयट्स स्पोर्ट्स बिझनेस ग्रूपमध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मॅनेजर म्हणून काम करत आहे. यापूर्वी त्याने नेक्सस कन्सल्टिंग ग्रूप- रोटमॅनमध्येही काम केले आहे. कुणाल याने त्याचे शालेय शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेतून केले. त्यानंतर त्याने एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे. तो एचआर कॉलेजमध्ये असताना स्पोर्ट्स काऊंसिलचा सदस्य होता.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली मालिका
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली. या मालिकेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा याच्याकडे होते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका 2-1ने आपल्या नावावर केली. (captain rohit sharma danced fiercely on dj wife ritika at brother in law wedding see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही’, रैनाने का उडवली पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची खिल्ली?
ब्रेकिंग! IND vs AUS वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच माजी कर्णधाराची अचानक निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---