गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये अनेक मोठ-मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. यापूर्वी फक्त कसोटी आणि वनडे क्रिकेट होते. परंतु, टी २० क्रिकेट आल्यापासून प्रेक्षकांना चौकार, षटकार आणि कमी चेंडूंमध्ये शतक, अर्धशतक पाहण्याची सवय झाली आहे. या खेळात सर्वोत्तम खेळाडूंकडून तीनही स्वरूपात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा केली आहे. काही खेळाडूंना असे करण्यास यश येते, तर काही खेळाडू अपयशी ठरतात.
भारतीय क्रिकेटमध्ये देखील असे ३ खेळाडू आहेत, ज्यांनी तीनही स्वरूपात चांगली कामगिरी केली आणि तुफानी शतक देखील झळकावले. त्याच ३ खेळाडूंबद्दल अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
१) रोहित शर्मा –
भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो मैदानाच्या चारही बाजूला धावा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. खेळाचे स्वरूप कुठलेही असो, तो आपल्या आक्रमक फलंदाजी शैलीत बदल करत नाही. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये ८ शतक झळकावले आहे, तर वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावे २९ शतकांची नोंद आहे. तसेच टी२० क्रिकेटमध्ये त्याने ४ शतक झळकावले आहे. त्याने आपल्या टी२० कारकिर्दीतील पहिले शतक २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झळकावले होते.
२) केएल राहुल –
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज केएल राहुलचा देखील तीनही स्वरूपात बोलबाला आहे. त्याने वनडे आणि टी२०क्रिकेट गाजवल्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. केएल राहुलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये एकूण ६ शतकं झळकावली आहेत, तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याला एकूण ५ शतकं झळकावण्यात यश आले आहे. तसेच टी २०आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर त्याला २ शतक झळकावण्यात यश आले आहे.
३)सुरेश रैना –
भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज होता. त्याने २०१० टी२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफानी शतकी खेळी केली होती. तसेच वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये देखील सुरेश रैनाने मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ५ शतक पूर्ण करण्यात यश आले होते. तर कसोटी आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला प्रत्येकी १-१ शतक झळकावण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्ली बुल्सला चीअर करण्यासाठी ‘बेबी डॉल’ची सामन्याला हजेरी, पतीसोबत पोहोचली अबू धाबीत
कडक ना भावा!! भारताविरुद्ध विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करत साउदीची दिग्गज खेळाडूशी बरोबरी
पुजाराला बाद करताच जेमिसनचा मोठा विक्रम, २० व्या शतकापासून ‘असा’ पराक्रम करणारा तिसराच