भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. तो ट्विटर, इंस्टाग्राम याबरोबरच टिक-टॉकवरदेखील लगातार व्हिडिओ शेअर करत आहे.
यूट्यूबवर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ चहलच्या मुलाखतीचा टीझर आहे. त्यामध्ये चहल स्वत: सांगत आहे की, “आयपीएलच्या (IPL) सामन्यांदरम्यान मी फलंदाजांना शिव्यासुद्धा देत होतो. मुद्दाम खोड काढण्यात मला मजा येते. मी माझ्या बहिनीची स्कूटीसुद्धा विकली होती.”
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) नुकतेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. या फोटोत आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), पार्थिव पटेल (Parthiv Patel) आणि मोईन अलीचे (Moeen Ali) नाव लिहिले होते. या नावांना वेगवेगळ्या वर्तुळात लिहिले होते. या फोटोबरोबर आरसीबीने चाहत्यांना प्रश्न विचारला होता की, “या तिन्ही सुपरस्टार्समध्ये काय साम्य आहे?”
https://www.instagram.com/p/B_UfIjJBC0g/?utm_source=ig_web_copy_link
यावेळी चहलने उत्तर दिले आणि तिन्ही खेळाडूंना ट्रोल केले. चहलने लिहिले की, “या तिन्ही खेळाडूंपैकी एकाही खेळाडूने मला कधीच आपली बॅट दिली नाही.” चहलच्या या उत्तरानंतर चाहत्यांनी चहललाच ट्रोल केले.
चहलने २०१६ मध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातून पदार्पण केले होते. तसेच तो आयपीएलमधील फ्रंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून खेळतो.
चहलने आतापर्यंत ५२ वनडे आणि ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत २५.८३ च्या सरासरीने एकूण ९१ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी२०त त्याने २४.३४ च्या सरासरीने ५५ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये त्याने ८४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २३.१८ च्या सरासरीेने एकूण १०० विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये करोडोंची कमाई करुन मालामाल झालेले ५ अष्टपैलू
-आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात
-जर आयपीएल झाली नाही तर १० कोटींवर पाणी सोडावे लागणारे ५ खेळाडू