पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीत आहे. पण भारतीय खेळाडू पाकिस्तानात जाण्यास तयार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचाही (बीसीसीआय) यासंबधी काही हेतू दिसत नाही. एका रिपोर्टनुसार टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानला जाण्याच्या मूडमध्ये नाहीत. याबाबत बीसीसीआय लवकरच आयसीसीशी बोलू शकते. 2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर हल्ला झाला होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही सुरक्षेची चिंता सतावू शकते.
वृत्त अहवालानूसार, टीम इंडियाचे अनेक खेळाडू पाकिस्तानात जाऊन खेळायला तयार नाहीत. यासोबतच बोर्डही पाकिस्तानात जाण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. जर टीम इंडिया पाकिस्तानला गेली नाही तर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपले सामने श्रीलंका किंवा दुबई येथे खेळू शकते.
2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता.
दहशतवादी घटनांमुळे पाकिस्तानचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. श्रीलंकेचा संघ 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. श्रीलंकेचे खेळाडू टीम बसमध्ये होते आणि लाहोरमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या दहशतवादी हल्ल्यात 5 पोलीस शहीद झाले आहेत. यासोबतच 6 खेळाडूही जखमी झाले आहेत. त्यामुळे अनेक वर्षे कोणताही संघ पाकिस्तानशी खेळायला गेला नाही.
भारत न गेल्याने पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार आहे.
टीम इंडियाने अनेक दिवसांपासून पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. यासोबतच टीम इंडिया आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाण्यास तयार नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून ते अजूनही सुरूच आहे. आशिया चषकासाठी टीम इंडिया पाकिस्तानलाही गेली नाही.
महत्तवाच्या बातम्या-
“अन्यथा मला हे बोनस…”, केवळ द्रविडच नाही तर रोहितनेही दाखवले मनाचा मोठेपणा
UEFA 2024, नेदरलँडला 2-1 ने नमवून इंग्लंडचे अंतिम सामन्यात धडक, फायनलमध्ये स्पेन विरुद्ध होणार जंगी लढत
आगामी श्रीलंका दाैऱ्याआधीच गाैतम गंभारची गुगली, हा स्टार होणार भारतीय संघाचा कर्णधार