चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमधील आज शेवटचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. तसेच रोहित शर्मा बाबत तो निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार रोहित शर्मा वनडे क्रिकेट मधून निवृत्ती घेऊ शकतो. त्यामुळे कदाचित आज शेवटचा तो ब्लू जर्सी मध्ये खेळताना दिसेल. रोहित शर्मा कडे दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे याआधी हा विक्रम महेंद्रसिंग धोनीने केला आहे.
पीटीआय नुसार चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा त्याच्या वनडे क्रिकेट करियरबद्दल मोठा निर्णय घेऊ शकतो. याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयावर किंवा पराभूत होण्यावर त्याचा निर्णय अवलंबून नसणार आहे. असं म्हणण्यात येत आहे की, रोहित शर्मा वनडे करिअर मधून निवृत्ती घेण्यासाठी आता तयार आहे. तसेच मागच्या दिवसात मीडिया रिपोर्टने दावा केला होता की, जर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी विजयी झाला तर रोहित शर्माचं वनडे करिअर अजून काही काळ चालू शकतं. पण आता याविषयी वेगळीच माहिती समोर येत आहे.
रोहित शर्माने तब्बल 18 वर्षांपूर्वी 2007 मध्ये वनडे करिअर मध्ये पदार्पण केलं होतं. तसेच 2024 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकला होता. याआधी रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चा किताब जिंकणाऱ्या भारतीय संघात सामील होता. रोहितने 264 वनडे सामन्यात भारतीय संघाच नेतृत्व केलं आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा ने 48. 64 च्या एव्हरेजने, 92.81 च्या स्ट्राईक रेटने 11,992 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माचा सर्वोत्तम स्कोर 264 आहे. रोहित शर्माने वनडे फॉरमॅटमध्ये 32 शतक आणि 57 अर्धशतक झळकावली आहेत.
हेही वाचा
आयसीसी स्पर्धेत ‘मालिकावीर’ पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू; पाहा यादी
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 3 भारतीय फलंदाज
आयसीसीच्या फायनलमध्ये भारताचे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार विजेते; पाहा यादी