रविवारी (दि. 14 मे) डबल हेडरचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आयपीएल 2023चा 61वा सामना हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात 7 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकत धोनीसेना प्ले-ऑफमधील जागा पक्की करण्याचा प्रयत्न करेल.
चेन्नई सुपर किंग्स संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मागील सामन्यातील संघासोबतच मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, केकेआर (KKR) संघात एक बदल आहे. अनुकूल रॉय संघातून बाहेर पडला असून वैभव अरोरा याची संघात एन्ट्री झाली आहे.
https://twitter.com/IPL/status/1657741591652753410
हंगामातील कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर 15 गुणांसह संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. सीएसकेने आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यात विजय, तर उर्वरित 4 सामन्यात पराभवाचा धक्का सहन केला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. तसेच, कोलकाता संघ 10 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यातील 5 सामन्यात विजय, तर 7 सामन्यात पराभव पत्करला आहे. (Chennai Super Kings have won the toss and have opted to bat Kolkata Knight Riders)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, महीश थीक्षणा
कोलकाता नाईट रायडर्स
रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), जेसन रॉय, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
ब्रेकिंग! राजस्थानच्या बालेकिल्ल्यात बेंगलोरचा 112 धावांनी दणदणीत विजय, ‘रॉयल्स’चे आव्हान संपुष्टात
याला म्हणतात कंसिस्टन्सी! IPL 2023मध्ये ‘अशी’ कामगिरी फक्त फाफलाच जमली, लगेच वाचा






