पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रविवारी (२८ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याची लढत झाली. या लढतीत भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ ने आपल्या नावावर केली होती.
भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंड संघासमोर ३३० धावांचे आव्हान ठेवले ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून एकहाती झुंज देत सॅम करनने नाबाद ९५ धावांची खेळी केली होती. परंतु त्याला सामना जिंकवून देण्यात अपयश आले होते. या खेळीनंतर चेन्नई सुपर किंग्स संघातर्फे त्याचे तोंडभरून कौतुक करण्यात आले आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने तुफान फटकेबाजी करत इंग्लंड संघासमोर ३३० धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लिश संघाकडून कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. डेव्हिड मालनने अर्धशतकी खेळी केली. मात्र ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सॅम करनने पूर्ण खेळच बदलून टाकला. त्याने अटीतटीच्या सामन्यात ८३ चेंडूंवर नाबाद ९५ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याचे कौतुक करत एमएस धोनी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
हा फोटो अत्यंत सुरेख पद्धतीने एडिट करण्यात आला आहे, ज्यामध्ये सामना जिंकवण्यात अपयशी ठरलेला सॅम करन जमिनीवर गुडघे टेकून बसला आहे आणि त्याच्यासमोर चेन्नई संघाची जर्सी परिधान केलेला एमएस धोनी त्याला सहानुभूती देत त्याची समजूत काढत आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन देत लिहिले आहे की, “प्रक्रिया जास्त महत्त्वाची असते, आम्ही यालाच सिंहाची भावना म्हणतो.”
https://twitter.com/ChennaiIPL/status/1376449149659320324?s=20
युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत, सॅम करनने चेन्नई सुपर किंग्स संघासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. भारताविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर आयपीएल २०२१ मध्ये सॅम करनकडून चेन्नई सुपर किंग्ज संघाला चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“टीम इंडियात जागा मिळत नसताना सूर्यकुमारने स्वत:ला सांभाळले, म्हणून…” दिग्गजाचे मोठे भाष्य
राजस्थान रॉयल्ससाठी खुशखबर! आर्चरच्या हाताची झाली सर्जरी, आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची शक्यता
माही भाई काहीही करु शकतो..! हार्दिकच्या ‘त्या’ प्रश्नावर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया






