---Advertisement---

चेन्नई सोडून आता मुंबईला रवाना होणार धोनी आणि कंपनी, ‘हे’ आहे कारण

On: गुरूवार, मार्च 25, 2021 6:11 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आली होती. यंदा मात्र पुन्हा एकदा भारतातच आयपीएलचा थरार रंगणार आहे.
आयपीएल सुरु व्हायला आता दोनच आठवड्यांचा कालावधी बाकी असून सगळ्याच संघांनी त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

यातीलच आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला मागील वर्षी बाद फेरी गाठण्यात देखील अपयश आले होते. त्यामुळे यंदा त्यांनी कसून तयारी केली असून संपूर्ण संघाचा काही दिवसांपूर्वी चेन्नई येथे ट्रेनिंग कॅम्प देखील आयोजित करण्यात आला होता. मात्र आता या ट्रेनिंग कॅम्पचे स्थळ बदलले जाणार आहे.

चेन्नईचा ट्रेनिंग कॅम्प आता दुसर्‍या शहरात
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आगामी हंगामाची तयारी करण्यासाठी १० मार्चपासूनच सराव सुरू केला होता. चेन्नई इथे त्यासाठीचा ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात आला होता. ज्यात खुद्द कर्णधार धोनीने देखील सहभाग घेतला होता. मात्र आता या ट्रेनिंग कॅम्पचे ठिकाण बदलले जाणार आहे.

चेन्नईवरून हा ट्रेनिंग कॅम्प आता मुंबईला हलवण्यात येणार आहे. चेन्नईच्या आयपीएल हंगामातील सामन्यांची सुरुवात देखील मुंबईतूनच होणार आहे. याबाबत चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी दिली. ते म्हणाले, “आम्ही आता निश्चितपणे आमचा ट्रेनिंग कॅम्प मुंबईमध्ये हलवत आहोत. संपूर्ण संघ २६ मार्च पर्यंत मुंबईत पोहोचेल.” त्यामुळे आता धोनीसह चेन्नईचे सगळे खेळाडू मुंबईला रवाना होतील.

२६ मार्चला मुंबईत पोहोचेल सुरेश रैना
चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू २६ मार्च रोजी मुंबईत पोहोचेल. तिथे तो एका आठवड्यासाठी हॉटेलमध्ये क्वारंटाईन होईल. आणि त्यानंतर संघासह सराव करण्यासाठी दाखल होईल. मागील आयपीएलमध्ये कौटुंबिक कारणांमुळे रैनाने माघार घेतली होती. मात्र यंदा तो परतत असल्याने चेन्नईचा संघ अजूनच मजबूत झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

स्वत:चा खर्च स्वत: ते बबल टू बबल सुविधा, वाचा आयपीएलचे १० नवे नियम; खेळाडूंसह कुटुंबालाही बंधनकारक

भारताची ही शॅडो टीम पाहिलीत का? इंग्लंड नाही तर जगातील कोणत्याही क्रिकेट संघाला पाजू शकेल पराभवाचे पाणी!

झक्कास! हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने लावले ब्लॅक स्विम सूटमध्ये ठुमके, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---