---Advertisement---

दु:खद बातमी! ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचे वडिल कालवश, चेन्नईत घेतला शेवटचा श्वास

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 1:08 PM
---Advertisement---

पाचवेळा विश्व चॅम्पियन राहिलेल्या बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिनांक १५ एप्रिल, गुरुवार रोजी त्याचे वडिल के विश्वनाथन यांचे चेन्नईत आजारपणामुळे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते.

कौटुंबिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, के विश्वनाथन यांनी शहरातील जवळच्या रुग्णालयात उपचार चालू असताना शेवटचा श्वास घेतला. दक्षिण रेल्वे विभागाचे पुर्व महाप्रबंधक राहिलेले के विश्वनाथन यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.

के विश्वनाथन यांची सुन आणि ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याची पत्नी अरुणा म्हणाल्या की, “आनंदला बुद्धिबळ क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी त्याच्या वडिलांनी खूप साहाय्य केले होते. त्यांनी आनंदचे विश्व चॅम्पियनशीपमधील सर्व विजय पाहिले होते. त्यांनी त्यांच्या मुलावर खूप चांगले संस्कार केले होते. त्यांना आनंदच्या उपलब्धतेंवर खूप गर्व होता.”

महत्त्वाच्या बातम्या-

कृणाल पंड्यासोबत झालेल्या वादानंतर ‘या’ खेळाडूंनी केली होती दीपक हुडाला मदत; वडिलांनी केला खुलासा

‘टॉपवर आरामात बसू नकोस,’ कोहलीची वनडे क्रमवारीतील बादशाहत संपवणाऱ्या आझमला दिग्गजाची चेतावणी

RCBvsSRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संकटमोचक, शाहबाज अहमद आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---