भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याचा आज (१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस असून भारताने पहिल्या डावात इंग्लंडपुढे ३३० धावांचे आव्हान ठेवले आहे. अशात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा इंग्लंडच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना दिसणार नाही.
भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करतेवेळी पुजाराच्या उजव्या हाताला जोरदार चेंडू लागला होता. तरीही त्याने पुढे फलंदाजी केली होती. अखेर ५८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने २१ धावा करत तो पव्हेलियनला परतला. जॅक लीचने बेन फोक्सच्या हातून त्याला झेलबाद केले.
परंतु ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर पुजाराच्या हाताला वेदना होऊ लागल्या. त्यामुळे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी इंग्लंडच्या डावात त्याला क्षेत्ररक्षणासाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याच्याजागी मयंक अगरवालला बदली क्षेत्ररक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे.
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, अंतिम षटकात रिषभ पंतने धडाकेबाज फलंदाजी करताना नाबाद ५८ धावा चोपल्या. तत्पुर्वी रोहित शर्माचे दीडशतक आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात ३२९ धावा फलकावर नोंदवल्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खास झाली नाही. २० षटकांच्या आतच त्यांनी पटापट ४ विकेट्स गमावल्या. यात रॉरी बर्न्स, डॉमिनिक सिब्ली, डॅनियल लॉरेन्स आणि जो रुट यांचा समावेश आहे.
Cheteshwar Pujara was hit on his right hand while batting on Day 1 of the second @Paytm Test against England at Chepauk. He felt some pain later. He will not be fielding today. #INDvENG pic.twitter.com/k0KkFOiHVC
— BCCI (@BCCI) February 14, 2021
लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड १८ षटकात ४ बाद ३९ धावांवर आहे. बेन स्टोक्स आणि ओली पोप फलंदाजी करत आहेत. इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अजून २९० धावा करायच्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतची फलंदाजीत बल्ले बल्ले! मागील ८ कसोटी डावात केलीत तब्बल ४ अर्धशतके
होय पक्काच! चेन्नई कसोटीत टीम इंडियाच्या ३०० पार धावा, मग विजय मिळणं निश्चित?