अॅडलेड। गुरुवार(6 डिसेंबर) पासून सुरु झालेल्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातीस पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 250 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली.
त्याने या सामन्यात 246 चेंडूत 123 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याचे आता 65 कसोटीत सामन्यात 11 षटकार झाले आहेत.
हे 11 षटकारही त्याने आत्तापर्यंत 10 गोलंदाजांच्या गोलंदाजीवर मारले आहेत. तसेच त्याने 2012 ते 2014 या तीन वर्षात प्रत्येकी एक षटकार तर 2015 ते 2018 या चार वर्षांत प्रत्येकी 2 षटकार मारले आहेत.
पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये आॅक्टोबर 2010मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने जवळ जवळ दोन वर्षांनी 2012 मध्ये कसोटी सामन्यात पहिला षटकार मारला होता.
2018 या वर्षांत आत्तापर्यंत कसोटीत 15 भारतीय फलंदाजांनी किमान एकतरी षटकार मारला आहे. यात पुजाराचाही समावेश झाला आहे. तसेच आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पुजारा 33 व्या क्रमांकावर आहे.
या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर पुजाराने मारले आहेत षटकार-
केन विलियमसन – 2012
पिटर सिडल – 2013
इश सोधी – 2014
इम्रान ताहिर – 2015 (2 षटकार)
जाफर अन्सारी – 2016
आदिल रशीद – 2016
तस्किन अहमद – 2017
मलिंडा पुष्पकुमरा – 2017
जोश हेजलवूड – 2018
मिशेल स्टार्क – 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पहिल्या सत्रात आॅस्ट्रेलियाच्या 2 विकेट्स घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश
–कसोटीमध्ये तब्बल ८२ वर्षानंतर घडला हा पराक्रम
–कसोटीत या गोलंदाजाने रोहित शर्माची घेतली आहे सर्वाधिक वेळा विकेट