---Advertisement---

WTC Final: पुजाराने खाते उघडण्यासाठी घेतले तब्बल ३६ चेंडू, चाहत्यांनी साधली ट्रोलिंगची संधी

On: शनिवार, जून 19, 2021 10:20 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शनिवार (१८ जून) पासून सुरुवात झाली. इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर या सामन्याला भारत आणि न्यूझीलंडच्या संघात हा सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

या डावात भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला फार खास कामगिरी करता आली नाही. या डावात तो केवळ ८ धावा काढून बाद झाला. मात्र यापेक्षा अधिक चर्चा झाली ती त्याने खाते उघडण्यासाठी घेतलेल्या चेंडूंची. त्याने या डावात पहिली धाव काढण्यासाठी त्याने तब्बल ३६ चेंडू खर्च केले. यावरून त्याला सोशल मिडीयावर ट्रोल देखील करण्यात आले.

मिम्स झाले व्हायरल
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र २१व्या षटकांत सलामीवीर रोहित शर्मा संघाच्या ६२ धावा झाल्या असतांना बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. पुजाराने त्याच्या नेहमीच्या शैलीने सावध फलंदाजी करायला सुरवात केली. यात त्याने खाते उघडण्यासाठी तब्बल ३६ चेंडू घेतले.

याच कारणावरून सोशल मिडीयावर भन्नाट मिम्स व्हायरल झाले. पुजाराच्या धीम्या फलंदाजीने कंटाळा येत असल्याची भावना यातून अनेकांनी व्यक्त केली. पाहा काही हटके मिम्स –

https://twitter.com/Being_circuit/status/1406213232914698246

https://twitter.com/benjonescricket/status/1406227597307039746

मोठी खेळी करण्यात पुजारा अपयशी
दरम्यान, सावध सुरुवातीनंतर पुजारा मोठी खेळी उभारेल, अशी भारतीय क्रिकेट रसिकांना अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्ण करण्यात पुजारा अपयशी ठरला. ५४ चेंडूत अवघ्या ८ धावा काढून तो तंबूत परतला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पायचीत पकडत त्याची ही छोटेखानी खेळी संपुष्टात आणली.

महत्त्वाच्या बातम्या – 

जॅक कॅलिसला मागे टाकत कोहलीने मिळवले दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

भारतीय प्रशिक्षकाने केली रोनाल्डोची नक्कल; व्हिडिओ भन्नाट व्हायरल

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात कोहलीची खास कामगिरी, ‘या’ विक्रमात केली गावसकरांची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---