---Advertisement---

ब्रावोसह ‘या’ विंडीज क्रिकेटरचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा? ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 10:59 AM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (६ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह हा सामना वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडूंसाठी कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला असल्याचे म्हटले जात आहे.

वेस्ट इंडिज संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात दोन वेळेस जेतेपद पटकावले आहे. परंतु आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत हा संघ साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. ५ सामन्यांपैकी या संघाला केवळ एकच सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे, ज्यामुळे वेस्ट इंडीज संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. वेस्ट इंडीजच्या टी२० विश्वचषकातील अंतिम सामन्यापूर्वी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना त्याच्यासाठी निरोप सामना ठरला आहे.

परंतु आता ख्रिस गेलचाही हा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरल्याचे म्हटले जात आहे. परंतु अजूनपर्यंत अधिकृतरीत्या गेलने यासंबंधी कुठलीही माहिती दिली नाहीये.

हा सामना झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलिया संघाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यासह मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी देखील त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. टी-२० क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम करणाऱ्या ख्रिस गेलने वेस्ट इंडिज संघाला २ वेळेस जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. परंतु यावेळी त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.

ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील तो अवघ्या १५ धावा करत माघारी परतला. ज्यावेळी तो बाद झाला त्यावेळी त्याने चारही बाजूला बॅट दाखवली. हे पाहून समालोचन करत असलेले इयान बिशप म्हणाले की, “गेलला वेस्ट इंडिजच्या जर्सीत पाहण्याची ही कदाचित शेवटची वेळ असावी. त्याचे साथीदार त्याला शुभेच्छा देत आहेत.”

तसेच वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोचा देखील हा शेवटचा सामना होता. पहिला डाव संपल्यानंतर संघातील खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. तर सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. यासह सामना झाल्यानंतर त्याने डेविड वॉर्नरसोबत मिळून चॅम्पियन डान्स देखील केला. तसेच त्याने मैदानात फिरून चाहत्यांचे देखील आभार मानले.

https://twitter.com/pant_fc/status/1456983008167165958?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1456983008167165958%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fcricket%2Fcricket-news%2Ficc-t20-world-cup-chris-gayle-and-dwayne-bravo-receives-guard-of-honour-after-end-of-last-group-match

सामना झाल्यानंतर ड्वेन ब्रावो म्हणाला की, “जोपर्यंत मला माझ्या शरीराची साथ मिळेल, मी फ्रँचायजी क्रिकेट खेळत राहणार.” तसेच ख्रिस गेल म्हणाला की, “माझी कारकीर्द अद्भुत राहिली आहे. मी अधिकृतरित्या निवृत्तीची घोषणा केली नाहीये. जर मला जमायकाच्या प्रेक्षकांसमोर खेळायची संधी मिळाली, तर मी नक्की खेळणार.”

महत्त्वाच्या बातम्या-

AFG v NZ : ‘निकाल काहीही येवो..’ अमिताभ यांच्या ट्विटमुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या विचारांत बदल

कागिसो रबाडाने रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध २०व्या षटकात घेतली ‘हॅट्रिक’, विक्रमांची घातली रास

तीन संघांचे भविष्य एका सामन्यावर ठरणार; जाणून घ्या अफगानिस्तान वि. न्यूझीलंड सामन्याबद्दल सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---