---Advertisement---

वेस्ट इंडीज वि‌ इंग्लंड कसोटी पाहण्यासाठी साक्षात ‘युनिव्हर्स बॉस’ची हजेरी; पाहा फोटोज

On: गुरूवार, मार्च 17, 2022 12:37 AM
GAYLE WATCH TEST
---Advertisement---

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (ENG vs WI) यांच्यमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून (१६ मार्च) बार्बाडोसमधील किंग्स ओव्हल मैदानावर सुरु झाला. या सामन्यात इंग्लंड संघ प्रथम फलंदाजी करत आहे. युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखल्या जाणरा ख्रिस गेलही (Chris Gayle) सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला आहे. त्याचा स्टेडीयममधील फोटो तुफान व्हायरल होत आहे.

क्रिकेट वेस्ट इंडीजने गेल स्टेडियममध्ये बसलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बोर्डाने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बघा किंग्स्टन ओव्हलवर कोण दिसत आहे.’ त्याच्या बाजूने प्रेक्षक त्याचा फोटो काढताना दिसत आहे. त्याने काढलेल्या फोटोत त्याच्यासोबत अजून एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. तो सन ग्लासेस घालून सामना पाहताना दिसत आहे.

https://twitter.com/windiescricket/status/1504120486988587011?t=d35EooBlDM1Yy4zTehF3FA&s=19

गेलच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने फलंदाजीत १४२ सामन्यात ४९६५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 31 अर्धशतके आणि ६ शतके झळकवली आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत १४२ सामन्यात १८ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये केकेआर, आरसीबी व पंजाब संघाकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये तुफानी यश मिळवले होते. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १०३ कसोटी सामन्यात ७२१५ धावा केल्या आहेत. तसेच ३०१ एकदिवसीय सामन्यात १०४८० धावा केल्या आहेत आणि ७९ टी२० सामन्यात १८९९ धावा केल्या आहेत.

कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाकडून दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. हे दोन्ही खेळाडू गोलंदाज आहेत. या दौऱ्यावर जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना इंग्लंडच्या निवड समितीने संघात घेतले नाही. अशा परिस्थितीत या दोघांच्या जागी मॅथ्यू फिशर आणि साकिब महमूद यांना संधी देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकले नाहीत, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पदार्पणाची संधी मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या-

अश्विनकडून जास्तीत-जास्त शिकण्याचा प्रयत्न करणार ‘हा’ युवा अष्टपैलू; म्हणाला…

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटीनंतर ‘अशी’ आहे WTC गुणतालिका; भारतीय संघ…

दिल्ली कॅपिटल्सला धक्का! संघाचा हुकमी एक्का ‘पृथ्वी शाॅ’बाबत मोठी बातमी…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---