गयाना। आजपासून(8 ऑगस्ट) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज(8 ऑगस्ट) प्रोविडन्स स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
या वनडे मालिकेत वेस्ट इंडीजचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलला खास तीन विक्रम करण्याची संधी आहे.
गेल भारताविरुद्धच्या मालिकेत करु शकतो हे तीन खास विक्रम –
#गेलने या मालिकेतील 2 सामने खेळले तर तो 300 वनडे सामने खेळणारा वेस्ट इंडीजचा पहिलाच क्रिकेटपटू ठरेल. तसेच आजचा सामना जर त्याने खेळला तर तो ब्रायन लाराच्या 299 वनडे सामन्यांची बरोबरी करेल.
सर्वाधिक वनडे खेळलेले वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू –
299 – ब्रायन लारा
298 – ख्रिस गेल
#गेलला वनडेत सर्वाधिक धावा करणारा वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ठरण्यासाठी 13 धावांची गरज.
वनडेत सर्वाधिक धावा करणारे वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू –
10405 – ब्रायन लारा
10393 – ख्रिस गेल
#एका वर्षात वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू होण्यासाठी गेलला 8 षटकारांची गरज. सध्या त्याने 2019 वर्षात वनडेत 51 षटकार मारले आहेत. तसेच एका वर्षात वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या एबी डिविलियर्सच्या नावावर असून त्याने 2015 मध्ये 58 षटकार मारले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एका टी२० सामन्यात तब्बल ७ विकेट्स घेत या गोलंदाजाने रचला इतिहास, पहा व्हिडिओ
–अबब !! प्रो कबड्डीमधील तब्बल ११ मोठे विक्रम डुबकी किंग परदीप नरवालच्या नावावर
–ख्रिस गेल-विराट कोहलीमधील ही शर्यत जिंकणार कोण?