---Advertisement---

तुफानी फॉर्ममध्ये असणाऱ्या ख्रिस गेलचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

On: शुक्रवार, मे 31, 2019 8:08 PM
---Advertisement---

नॉटिंगघम। आज(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला. विंडीजकडून आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने अर्धशतकी खेळी करत विंडीजच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात विंडीजकडून 34 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. ही त्याची वनडेमधील सलग सहाव्या डावात केलेली 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी होती. त्यामुळे त्याने एक खास विक्रम केला आहे.

वनडे मध्ये सलग 6 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो विंडीजचा दुसराच खेळाडू ठरला आहे. याआधी असा कारनामा गॉर्डन ग्रीनीज यांनी केला होता. त्यांनी 1979-1980 च्या दरम्यान सलग सहा वनडे डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

तसेच वनडेमध्ये सलग 6 किंवा त्यापेक्षा अधिक डावात 50 पेक्षा अधिक धावा आत्तापर्यंत 8 क्रिकेटपटूंनी केल्या आहेत. गेल हा पराक्रम करणारा एकूण 8 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक सलग डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जावेद मियाँदाद यांनी केल्या आहेत. त्यांनी सलग 9 डावात 50 पेक्षा अधिक धावा केल्या केल्या आहेत. अन्य 7 क्रिकेटपटूंनी सलग 6 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

विंडीज विरुद्ध पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्याचा थोडक्यात आढावा – 

ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडलेल्या आजच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 21.4 षटकात सर्वबाद 105 धावा केल्या. त्यांच्याकडून फकार जामन(22), बाबर आझम(22), मोहम्मद हाफिज(16) आणि वहाब रियाज(18) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

विंडीजकडून गोलंदाजीत ओशान थॉमसने सर्वाधिक 4 विकेट घेतली. तसेच कर्णधार जेसन होल्डरने 3 विकेट्स, आंद्रे रसलने 2 विकेट्स आणि शेल्डन कॉटरेलने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग विंडीजने गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर 13.4 षटकात सहज पूर्ण केले. विंडीजकडून निकोलस पूरननेही 19 चेंडूत नाबाद 34 धावांची तुफानी छोटेखानी खेळी करत या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

पाकिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद अमीरने तीन विकेट्स घेतल्या.

वनडेमध्ये सर्वाधिक सलग डावात 50 पेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू – 

9 डाव – जावेद मियाँदाद, 1987

6 डाव  – गॉर्डन ग्रीनीज, 1979-80

6 डाव – अँड्र्यू जोन्स, 1988-89

6 डाव – मार्क वॉ, 1999

6 डाव – मोहम्मद युसुफ, 2003

6 डाव – केन विलियम्सन, 2015

6 डाव – रॉस टेलर , 2018-19

6 डाव – ख्रिस गेल, 2018-19*

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे विश्वचषकातील षटकार किंग, जाणून घ्या कारण

प्रतिस्पर्धी खेळाडूंना धावबाद करण्यासाठी टीम इंडिया करतीय कसून सराव, पहा व्हिडिओ

Video: विराट करतोय गोलंदाजीचा सराव, चाहत्यांनी दिला खास सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment