अबु धाबी येथे शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयपीएल २०२० चा ५० वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाता झाला. या सामन्यात युविव्हर्सल बॉस ख्रिस गेल आयपीएलमधील आपले सातवे शतक ठोकण्यापासून हुकला. तो बाद झाल्यानंतर त्याने असे काही केले, जे पाहून सर्व आश्चर्यचकीत झाले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आणि पंजाबला फलंदाजीस आमंत्रित केले होते. यावेळी पंजाबकडून सलामीला मनदीप सिंग आणि कर्णधार केएल राहुल उतरले होते, परंतु पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मनदीप झेलबाद झाला. पुढे गेल फलंदाजीस आला. गेलने येता सुरुवातीला सावकाश खेळी केली. परंतु त्यानंतर त्याने जी फटकेबाजीला सुरुवात केली ती उल्लेखनीय होती.
पंजाबच्या डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आला होता. आर्चरच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत गेल ९९ धावांवर पोहोचला होता. यावेळी त्याला आयपीएल कारकिर्दीतील आपले सातवे शतक ठोकण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता होती. परंतु आर्चरने यॉर्कर चेंडू टाकत गेलला त्रिफळाचीत केले. यानंतर गेल चिडला आणि त्याने आपल्या हातातील बॅट फेकून दिली.
त्याने बॅट फेकल्यानंतर गोलंदाज आर्चरला टाळी दिली. हे पाहून चाहत्यांनीही गेलचे सोशल मीडियावर कौतुक केले. यादरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/12Geofinn/status/1322210776963117056
https://twitter.com/ShubhamSpeak27/status/1322209321002823680
https://twitter.com/Amiksha40408901/status/1322229176510803973
https://twitter.com/not_dat_guy/status/1322221342670794752
The sportsmanship – Chris Gayle shook Jofra Archer's hand for bowling a beauty to knock him out on 99.#chrisgayle #JofraArcher #Dream11 #IPL2020 #KXIP pic.twitter.com/HdC6KsH9c7
— Puneet Kumar Dwivedi (@puneetdwivedi22) October 30, 2020
Chris Gayle misses out a hundred by a run. @IPL@DipakYA41809791 @cricbuzz @theDcricket @CricketNDTV pic.twitter.com/t7k4RYB5eG
— Dipak YADAV (@DipakYA41809791) October 30, 2020
विशेष म्हणजे गेलने या सामन्यात आपले टी२० क्रिकेटमधील १००० षटकारांचा टप्पाही पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-एकेवेळी करणार होता आत्महत्या; आता करणार भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल
-धोनी पुन्हा फॉर्ममध्ये आणण्याचा फॉर्मुला सापडला, श्रीलंकन दिग्गजाने सुचवला मोठा उपाय
-लॉकडाऊनमध्ये पत्नीसोबत केला टेरेसवर फलंदाजीचा सराव, आता आयपीएलमध्ये धुतोय गोलंदाजांना
ट्रेंडिंग लेख-
-CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
-अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
-IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान