पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीगचा सहावा हंगाम सुरू आहे.आयपीएलच्या धर्तीवर खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंसह देशभरातील विविध नामांकित खेळाडू सहभागी होत असतात. वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल हा दोन सामने खेळल्यानंतर मायदेशी रवाना झाला आहे. मात्र, मायदेशी परतण्यापूर्वी त्याने एक मजेदार व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन केले.
गेलचे सलवार चॅलेंज
गेल पाकिस्तानहून मायदेशी जमैकाला रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान सुपर लीगच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनतसेच यूट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये गेलने सलवार चॅलेंज स्वीकारलेल्या दिसून येते. एका सलवारचा नाडा ओवून ती सलवार घालायची अशाप्रकारचे हे चॅलेंज होते. गेलने १ मिनिट व ५९ सेकंदांमध्ये हे चॅलेंज पूर्ण केले. मात्र, त्यानंतर सलवारची रुंदी पाहून तो आश्चर्यचकित झाला. कारण, ही रुंदी सामान्य सलवारपेक्षा खूपच अधिक होती.
😂hilarious! 😂Chris Gayle does the Shalwar challenge. “This person eats too much” 😂😂😂😂 https://t.co/C832TRvKp6
— Mazher Arshad (@MazherArshad) February 25, 2021
क्वेटा ग्लॅडिएटर्सचा भाग होता गेल
आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा गेल पाकिस्तान सुपर लीगच्या सहाव्या हंगामात क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग होता. गेलने पहिल्या दोन सामन्यात कराची किंग्सविरुद्ध ३९ तर लाहोर कलंदर्सविरुद्ध ६८ धावांची खेळी केली होती. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी राष्ट्रीय संघात त्याची निवड होण्याची शक्यता असल्याने त्याने पीएसएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ४१ वर्षीय गेलने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना भारताविरुद्ध २०१९ मध्ये खेळला होता. गेल मायदेशी गेल्याने क्वेटा ग्लॅडिएटर्स संघामध्ये त्याची जागा दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिस हा घेईल.
टी२० दिग्गज आहे गेल
‘युनिव्हर्स बॉस’ असे बिरूद मिरवणाऱ्या गेलने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० व जगभरातील व्यावसायिक टी२० लीगमध्ये मिळून ४१३ सामने खेळताना १३,६९१ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये तब्बल २२ शतकांचा देखील समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अंपायरने नाबाद देऊनही घेतला रिव्ह्यू अन् पडले तोंडघशी; मग पंचाने केलं असं काही की पोट धरुन हसाल
एकट्याच्या जीवावर इंग्लंड नडणारा परंतू आता विस्मृतीत गेलेला वेणुगोपाल राव
‘नाडियाडचा जयसूर्या’ ते ‘अहमदाबादचा हिरो’ असा प्रवास करणारा अक्षर पटेल