---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची घोषणा, प्रत्येक षटकारामागे २५० डॉलर देत वाचवणार लोकांचे प्राण

On: शनिवार, जानेवारी 4, 2020 11:44 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स (New South Wales) आणि व्हिक्टोरिया (Victoria) येथे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि फलंदाज ख्रिस लिन (Chris Lynn) यांनी या ऑस्ट्रेलियाच्या मदतीत हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.

या दोन खेळाडूंनी सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) प्रत्येक षटकार मारल्यानंतर 250 डाॅलर देण्याचे आश्वासन दिले आहे.

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरियामध्ये लागलेल्या आगीत सर्वात जास्त नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरपासून लागलेल्या या आगीत आतापर्यंत तब्बल 5 लाख जंगली जनावरांनी आपला जीव गमावला आहे.

ऑस्ट्रेलिया देशातील जवळपास 5 राज्यांमध्ये पसरलेली ही आग 1.2 कोटी एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरली आहे. या आगीत 18 लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण अजून बेपत्ता आहेत. त्यामुळे या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी मदतीसाठी हात पुढे केला आहे.

“या बिग बॅश लीगमध्ये मी जेवढेपण षटकार मारेल त्या प्रत्येक षटकारासाठी 250 डाॅलर देईल. हे पाहणे खूप चांगला अनुभव असेल की, विविध खेळांशी जोडलेले अनेक खेळाडू जीवन आणि नैसर्गिक संपत्ती वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील,” असे लिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

यानंतर लिनला उत्तर देताना मॅक्सवेल म्हणाला की, “खूप छान लिनी!! मीसुद्धा तुझ्याप्रमाणे बीबीएलमध्ये मारलेल्या प्रत्येक षटकारासाठी 250 डॉलरची मदत करेल. हे आपल्या देशातील चिंतेत असणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी करण्यात येणारे एक चांगले काम आहे.”

यापूर्वी टेनिसपटू निक किर्गियाॅस यावर्षी उन्हाळ्यात खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत त्याच्याकडून मारल्या जाणाऱ्या प्रत्येक एसवर(ace) 200 डॉलर मदतीसाठी देण्याची घोषणा केली होती.

या खेळाडूंव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या अन्य खेळाडूंनीही मदत जाहिर केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---