---Advertisement---

अविश्वसनीय! ताशी १४८ किमी वेगवान चेंडूवर ख्रिस लिनने मारला तब्बल १२१ मीटरचा षटकार, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, नोव्हेंबर 21, 2020 9:56 AM
---Advertisement---

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बराच काळ क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन केले गेले नाही. मात्र, आता सर्व खबरदारी घेऊन क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी20 स्पर्धा बिग बॅश लीग 10 डिसेंबर 2020 पासून सुरु होतेयं.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला व्हिडिओ

ही स्पर्धा सुरु व्हायच्या आधीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सर्वोत्कृष्ट षटकार मारणाऱ्या फलंदाजांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ख्रिस लिन याने मारलेल्या षटकाराची जोरदार चर्चा आहे.

ख्रिस लिनने मारला 121 मीटर लांब षटकार

ख्रिस लिन हा ब्रिस्बेन हिट या संघाकडून खेळतो. तो सलामीला फलंदाजी करतो. होबार्ट हरिकेनविरुद्धच्या एका सामन्यात तो खेळपट्टीवर फलंदाजी करत होता. त्याचदरम्यान डावाच्या 7 व्या षटकांत वेगवान गोलंदाज शॉन टेट गोलंदाजी करायला आला. पहिलाच चेंडू त्याने 148 किमी प्रति तास या वेगाने फेकला. मात्र, ख्रिस लिन यानेही त्याला जशास तसे उत्तर दिले आणि त्या चेंडूवर लांबलचक षटकार ठोकला. हा षटकार तब्बल 121 मीटर लांब गेला.

Biggest BBL Moments No.5: Lynn hits Tait out of the Gabba

हा षटकार मारल्यानंतर ख्रिस लिन याने दुसऱ्या टोकावर उभा असलेल्या फलंदाजाला पाहून डोळाही मारला.

बिग बॅश मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस लिन अव्वल स्थानी
ख्रिस लिन याने बिग बॅशमध्ये 2011 ते 2020 या कालावधीत 77 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने तब्बल 146 षटकार ठोकले आहेत. हे बिग बॅशमध्ये कोणत्याही फलंदाजाने ठोकलेले सर्वाधिक षटकार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

दुष्काळात तेरावा महिना ! दक्षिण आफ्रिका संघाच्या पुन्हा एका खेळाडूला कोरोनाची लागण

लंका प्रीमियर लीगमागची साडेसाती संपेना; दोन खेळाडू कोरोनाबाधित

‘मला रोहितकडून सेहवागसारख्या खेळींची अपेक्षा’, भारतीय दिग्गजाचे ‘हिटमॅन’बद्दल मोठे वक्तव्य

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---