---Advertisement---

Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक

On: मंगळवार, डिसेंबर 1, 2020 7:57 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन याला आयपीएल २०२० च्या हंगामात एकही सामना खेळायला मिळाला नाही. परंतु असे असले तरीही तो ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या क्वीन्सलँड प्रीमियर लीग या टी२० स्पर्धेत आपल्या तुफान फलंदाजीने मैदान गाजवत आहे. रविवारी (२९ नोव्हेंबर) ब्रिसबेन येथे टूमबुल विरुद्ध सनशाईन कोस्ट सामन्यात केलेल्या फटकेबाजीचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लिनने क्वीन्सलँड प्रीमियर क्रिकेट टी२० मध्ये टूमबुलकडून सनशाईनविरुद्ध खेळताना अवघ्या ५५ चेंडूंत १५४ धावा ठोकल्या. या धावा करताना त्याने २० षटकारांचा पाऊस पाडला. यांतील १२० धावा तर त्याने फक्त २० षटकारांच्या मदतीने पूर्ण केल्या. लीनसोबतच मॅट रेनशॉ यानेही त्याची चांगली साथ दिली. रेनशॉने २९ चेंडूत ५५ धावा ठोकल्या. या दोघांच्याही जबरदस्त खेळीमुळे टूमबुलने ६ विकेट्स गमावत २६६ धावांचा भला मोठा डोंगर सनशाईन संघापुढे ठेवला.

या आव्हानाचा पाठलाग करताना सनशाईन संघाने ७ विकेट्स गमावत केवळ २४८ धावाच केल्या. यावेळी सनशाईन संघाकडून ब्लॅक मेहरने ३५ चेंडूत शतक ठोकले. परंतु त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

लिन टी२० क्रिकेटमध्ये सर्वात विस्फोटक खेळाडूंपैकी एक आहे. बिग बॅश लीगमध्ये लिनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. लिनने ब्रिसबेन हीटसंघासाठी ७५ सामन्यात एकूण २३३२ धावा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे बिग बॅश लीगचा पुढील हंगाम १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

खरं तर लिनला आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले होते. परंतु त्याला एकही सामना खेळता आला नाही. आयपीएल २०२० च्या लिलावात लिनला २ कोटी रुपये देत मुंबईने आपल्या संघात सामील केले होते. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होता.

लिनने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४१ सामन्यांत ३३.६८ च्या सरासरीने १२८० धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १० अर्धशतकेही आपल्या नावावर केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Video : लई भारी ! ऑस्ट्रेलियात घुमला छत्रपती शिवरायांचा जयघोष, तिरंग्यासोबत भगवाही झळकला

Video: स्मिथने भन्नाट डाइव्ह मारत घेतला अय्यरचा झेल; दाखवला तंबूचा रस्ता

अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख-

भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश

भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज

‘हा’ विक्रम करत कोहलीने धोनीलाही टाकले मागे, दिग्गज कर्णधारांच्या पंक्तीत मिळविले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---