---Advertisement---

थेट हँग! बुमराहचा तुफान बॉल; स्टोक्सच्या दांड्या गुल, पाहा व्हिडीओ

On: शनिवार, फेब्रुवारी 3, 2024 6:27 PM
Japrit Bumrah Ben Stokes
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यातील पहिल्या डावात यजमान भारतीय संघ इंग्लंडवर भारी पडला. फलंदाजीमध्ये यशस्वी जयस्वास आणि गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह यांनी अक्षरशः इंग्लिश फलंदाजांचा घाम काढला होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने बुमराहच्या एका चेंडूवर अंदाज बांधू शकला नाही आणि त्रिफलाचीत झाला.

उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 112 षटकांमध्ये भारतीय संघ 396 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात कशीबशी 253 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जयस्वाल याने पहिल्या डावात 290 चेंडूत 209 धावा केल्या. तर गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 6 विकेट्स नावावर केल्या. पहिल्या डावाखेर भारताकडे 143 धावांची आघाडी होती. दुसऱ्या दिवसाचा म्हणजे शनिवारचा (3 फेब्रुवारी) खेळ संपेपर्यंत भारताने 171 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडसाठी पहिल्या डावात सलामीवीर झॅक क्रॉली याने 78 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तर कर्णधार बेन स्टोक्स 54 चेंडूत 47 धावा करून बाद झाला.

बुमराहनेच बेन स्टोक्सचा त्रिफळा उडवला. इंग्लंडचा कर्णधार संघासाठी मोठी खेळी करेल, असे वाटू लागले होते. पण तितक्यातच बुमराहने त्याची विकेट घेतली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वतः बेन स्टोक्स देखील बुमराहच्या या चेंडूवर आश्चर्यचकीत झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. विकेट गमावल्यानंतर स्टोक्सच्या चेहऱ्यावरील नाराजी या विकेटचे महत्व सांगून जाते.

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव

इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---