भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पहिल्या तीन महिन्याचे वेतन म्हणून बीसीसीआय कडून १ कोटी २० लाख रुपये देण्यात आले आहे.
रवी शात्री यांनी १८ जुलै रोजी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांचे हे वेतन १८ जुलै ते १७८ ऑक्टोबर या कालावधीसाठीचे आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांना १,२०,८७,१८७ रुपये दिले आहेत.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला परदेशात झालेल्या स्पर्धाच्या नफ्यातून ५७ लाख रुपये देण्यात आले आहे. दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यानाही यावेळी रणजी ट्रॉफीसाठी ६९लाख तर विजय हजारे ट्रॉफीसाठी ५६ लाख रुपये देण्यात आले आहे.