fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

थेट ख्रिस गेलला बाहेरचा रस्ता दाखवून दिग्गजाने असा तयार केला पंजाबचा संघ

Commentator aakash chopra picks kings xi punjab playing eleven no place for sixer king chris gayle in the team

September 15, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ Lionsdenkxip

Photo Courtesy: Twitter/ Lionsdenkxip


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघ स्पर्धेसाठी जोरदार तयारी करीत आहेत. त्याशिवाय स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनुभवी क्रिकेटपटू आयपीएल संघातील प्लेइंग इलेव्हनची निवड करत आहेत.

नुकतेच, माजी क्रिकेटपटू आणि आकाश चोप्राने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनची निवड केली. आता त्याने केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.

आश्चर्यकारक निर्णय घेत आकाश चोपडाने जगातील सर्वात धोकादायक टी20 फलंदाज ख्रिस गेलची निवड केली नाही. हा धक्कादायक निर्णय आहे कारण गेल एक अतिशय स्फोटक फलंदाज असून आयपीएलमधील सर्वोत्तम डाव (175 धावा) खेळला आहे.

इतकेच नाही तर टी20 प्रकारात गेलकडे 1000 षटकारांच्या आकड्याला स्पर्श करण्याची उत्तम संधी आहे. हा असा विक्रम आहे जो कदाचित कोणीही मोडू शकणार नाही. आयपीएलमध्येही सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर आहे.

आयपीएलमध्ये 326 षटकार ठोकणार्‍या गेलने टी20 प्रकारात एकूण 978 षटकार ठोकले आहेत आणि आयपीएलच्या आगामी हंगामात त्याने आणखी 22 षटकार ठोकले तर त्याच्या नावावर 1000 टी20 षटकार असेल.

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या या संघात आकाशने कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवालची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तिसर्‍या क्रमांकावर त्याने दोन खेळाडूंची निवड केली. यात करुण नायर आणि मनदीप सिंग यांची नावे आहेत.

मधल्या फळीत आकाशने निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, सर्फराज खान यांची निवड केली. खालच्या क्रमांकावर कृष्णप्पा गौथम आणि ख्रिस जॉर्डन यांचा समावेश आहे.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर जॉर्डन व्यतिरिक्त मोहम्मद शमी संघात असेल. मुजीब उर रहमान आणि रवी बिश्नोई हे फिरकी गोलंदाज असेल.

आकाश चोपडाने निवडलेला संभाव्य किंग्ज इलेव्हन पंजाब संघ- केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, करुण नायर / मनदीप सिंग, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान, कृष्णप्पा गौथम, ख्रिस जॉर्डन, मुजीब उर रहमान, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी.

आयपीएलच्या वेळापत्रकानुसार, केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ 20 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळला जाईल.

लीग फेरीदरम्यान सर्व संघ एकमेकांविरूद्ध दोन सामने खेळतील. त्यामुळे एक संघ एकूण 14 सामने खेळेल.

किंग्ज इलेव्हन पंजाबची संपूर्ण टीम- केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, मुजीब जादरान, शेल्डन कॉटरल, हरदास विल्जॉयन, दर्शन नलकांडे, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, मनदीप सिंग, सरफराज खान, के गौतम, जे सुचित, रवी बिश्नोई, दीपक हुडडा, तजिंदर ढिल्लों, प्रभसीमरण सिंग आणि मुरुगन अश्विन.


Previous Post

४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय

Next Post

अर्जुन तेंडूलकरचे फोटो होतायत व्हायरल, थेट मुंबई इंडियन्सच्या…

Related Posts

Pune District Purandar Taluka Pisarve Gram Panchayat Election Result Mahesh Waghmare Winning Candidate Special Story
ब्लॉग

युवा क्रीडा पत्रकारानं उधळला विजयी गुलाल! तालुक्यात एकच चर्चा, दुप्पट वयाच्या उमेदवाराला चीतपट केलंय पोरानं

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ HomeOfCricket

अर्जुन तेंडूलकरचे फोटो होतायत व्हायरल, थेट मुंबई इंडियन्सच्या...

Photo Courtesy: Twitter/ ICC

या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनोबलाला बसेल फटका; दिग्गजाने व्यक्त केले मत

Photo Courtesy: Twitter/ICC

माजी दिग्गजही झाला विंडीजच्या 'या' खेळाडूचा चाहता; केली डिविलियर्ससोबत बरोबरी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.