मंगळवारी(१७ नोव्हेंबर) पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कराची किंग्सने लाहोर कलंदर्सला ५ विकेट्सने पराभूत करत पहिल्यांदाच पीएसएलचे विजेतेपद जिंकले. पीएसएलचा हा असा पहिला हंगाम होता, जो संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेला. तसेच या स्पर्धेचे साखळी फेरीचे सामने मार्चमध्ये पार पडले होते. मात्र त्यानंतर कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्लेऑफचे सामने ८ महिन्यांनंतर पार पडले.
विशेष म्हणजे इंडियन प्रीमीयर लीग २०२० आणि पीएसएल २०२० या दोन्ही स्पर्धांचे अंतिम सामने ७ दिवसांच्या अंतराने पार पडले. त्यामुळे या दोन स्पर्धांमध्ये तुलना झालेली पाहायला मिळाली. या दोन्ही स्पर्धांच्या बक्षीस रक्कमेतही बरीच तफावत आहे. या बाबत या लेखात आपण जाणून घेऊ.
पीएसएल विजेत्यापेक्षा आयपीएल विजेत्या संघाला मिळाली ५ पटीने अधिक रक्कम
आयपीएलला जगभरातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांना अनेक मोठे प्रायोजकही मिळतात. त्याचमुळे त्यांच्या आणि इतर स्पर्धांच्या बक्षीस रक्कमेतही मोठी तफावत पाहायला मिळते. पीएसएलबाबतही वेगळे काही नाही.
युएईमध्ये पार पडलेल्या यंदाच्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मिळवले. या विजेतेपदानंतर मुंबईला भारतीय चलनानुसार २० कोटी रुपये बक्षीस मिळाले. तर उपविजेत्या दिल्लीला १२.५ कोटी रुपये बक्षीस मिळाले. दुसरीकडे पीएसएलच्या या हंगामातील विजेत्या कराची संघाला भारतीय चलनानुसार ३.७५ कोटी रुपये तर उपविजेत्या लाहोर कलंदर्सला १.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. म्हणजेच पीएसएल विजेत्यापेक्षा जवळपास ५ पटीने अधिक रक्कम आयपीएल विजेत्या संघाला मिळाली.
याबरोबर आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांनाही बक्षीस रक्कम दिली जाते. त्यामुळे यंदा अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांना प्रत्येकी ८.७५ कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे पीएसएल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला कोणतीही बक्षीस रक्कम देत नाही.
दोन्ही स्पर्धांमध्ये संघांना मिळालेली बक्षीस रक्कम पाहाता आयपीएलच्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघापेक्षाही पीएसएलच्या विजेत्या संघाला जवळपास अडीचपट कमी बक्षीस रक्कम मिळाली आहे.
वैयक्तीक बक्षीस रक्कम मात्र सारखीच –
सांघिक बक्षीस रक्कमेत जरी मोठा फरक दिसत असला तरी आयपीएल आणि पीएसएलमध्ये वैयक्तिक बक्षीस रक्कमेत मात्र साम्य आहे. आयपीएलममध्ये ऑरेंज, कॅप, पर्पल कॅप, व्हॅल्यूएबल प्लेअर, एमर्जिंग प्लेअर, सर्वाधिक षटकार, पॉवर प्लेअर अशा वैयक्तिक पुरस्कार विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतात.
दुसरीकडे पीएसएलमध्ये देखील सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, सर्वोत्तम यष्टीरक्षक, एमर्जिंग प्लेअर अशा वैयक्तिक पुरस्कार विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपये बक्षीस मिळतात.
पीएसएलची संपूर्ण बक्षीस रक्कम आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकाच्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रक्कमेपेक्षा कमी
पीएसएलची संपूर्ण बक्षीस रक्कम ही ७.५ कोटी रुपये आहे, जी आयपीएलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांच्या संघाला मिळणाऱ्या प्रत्येकी बक्षीस रक्कमेपेक्षाही कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कराची किंग्स पाकिस्तान सुपर लीगचा विजेता; आयपीएल पाठोपाठ ‘या’ खेळाडूला ७ दिवसात दुसरे विजेतेपद
आयपीएलमध्ये अपयश आलेला विराट लागला कसोटीच्या तयारीला, पाहा कसा सुरु केलाय सराव
आयपीएल २०२०चा सुपरस्टार ‘वरुण चक्रवर्ती’ सोशल मीडियावरही ठरला सुपर, एका फोटोने…
ट्रेंडिंग लेख –
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला