भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) आपला आठवा सामना खेळत आहे. या सामन्यात भारतापुढे दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान आहे. उभय संघ कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स येथे समोरासमोर आहेत. यावेळी विराट कोहली याने शतक ठोकत आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे शतकांची संख्या 49 पर्यंत नेली. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांची बरोबरी केली. विशेष म्हणजे विराटने आपले पहिले शतक देखील याच मैदानावर ठोकले होते.
KOLKATA, 2009
Virat Kohli came in when Sachin Tendulkar was out.
Scores his first ODI century.KOLKATA, 2023
Virat Kohli scores his 49th ODI century.
Equals Sachin Tendulkar's record.#INDvSA pic.twitter.com/DNDiPqQtzD— Kausthub Gudipati (@kaustats) November 5, 2023
विराट कोहली (Virat Kohli) रविवारी आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना खूपच खास ठरला. या सामन्यात त्याने 121 चेंडूंचा सामना करताना 101 धावांची नाबाद शतकी खेळी केली आहे. त्याच्या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. त्याने आपले 49 वेवंडे शतक पूर्ण करताना सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली.
विराटने 2008 मध्ये भारतासाठी पदार्पण केल्यानंतर आपले पहिले शतक 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध ठोकले होते. ईडन गार्डन्सवरच झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 300 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केलेला. त्यानंतर आता त्याने विश्वविक्रमी 49 वे शतक देखील येथेच झळकावले.
विराट कोहलीची विश्वचषकातील कामगिरी
विराट कोहली याच्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर तो खूपच दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यात 108.40 च्या सरासरीने 542 धावा केल्या आहेत. विराटच्या बॅटमधून यादरम्यान 4 अर्धशतके व 2 शतके आली आहेत. यासह तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
(Complete Circle Of Virat Kohli 49 ODI Century On Eden Gardens He Hits First There)
हेही वाचा-
अवघ्या आठ डावांमध्ये विराटची मोठी मजल, फक्त सचिन आणि रोहितला जवलेली कामगिरी दाखवली करून
तो आला आणि विक्रम मोडून गेला! श्रेयसने 77 धावांची खेळी करताच सचिनचा ‘तो’ Record उद्ध्वस्त