आयपीएल 2020 उंबरठ्यावर असताना मात्र जगात कोरोनोवायरसचा हलकल्लोळ सुरु आहे. यास्थितीत खेळाडूंना चिंता वाटणे साहजिकच आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड सुध्दा याच चिंतेत आहे.
त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आयपीएलच्या दरम्यान आपल्या खेळाडूंना कोरोनावायरसबद्दल सतत अपडेट्स देत राहील. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनसह एकुण 6 खेळाडू आयपीएल 2020 मध्ये खेळणार आहेत. तसेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आता बीसीसीआयच्या परीपत्रकाची वाट बघत आहे.
गुरुवार सकाळपर्यंत भारतात कोरोनावायरसचे एकुण 29 रूग्ण असल्याचे समोर आले आहे. जगाभरात सध्या कोरोनावायरसचे जवळपास 90 हजार रूग्ण आहेत. यापैकी तीन हजारहून जास्त लोंकांचा यामुळे मृत्यू झालेला आहे.
एका न्यूज एजन्सीशी बोलताना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे पीआरओ रिचर्ड बुक आयपीएलमध्ये जाणाऱ्या खेळाडूंबद्दलही बोलले. “पुरुष आणि महिला खेळाडूंना आम्ही कोरोनावायरसबद्दल जागरूक करत आहोत. कोरोनावायरसपासून वाचण्यासाठीच्या उपायांबद्दल आम्ही वेळोवेळी खेळाडूंना माहीती देत आहोत. बोर्डाचे चीफ मेडिकल ऑफिसर फॉरेन, हेल्थ, ट्रेड आणि स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या संपर्कात आहेत. आम्ही डब्लूएचओकडूनही अपडेट्स घेत आहोत.”
न्यूझीलंडचे एकूण 6 खेळाडू आयपीएल 2020 मध्ये खेळणार आहेत. यामध्ये जिमि नीशाम (किंग्स इलेवन पंजाब), लॉकी फर्ग्युसन (कोलकाता नाईट रायडर्स), मिशेल मॅक्लाघन आणि ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स), केन विलियम्सन (सनराइजर्स हैदराबाद) आणि मिशेल सँटनर (चेन्नई सुपर किंग्स) यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–“भारताचे अभिनंदन पण इंग्लंड संघाचे वाईट वाटले”
–रविवारी टीम इंडियाची विश्वचषकातील साडेसाती संपणार का?
–टीम इंडियाला विश्वचषक फायनलमध्ये या खेळाडूच्या ट्विटपासून पराभवाचा धोका?