क्रिकेट जगतात नुकत्याच काही वर्षात एक नवीन नियम आला आहे. तो म्हणजेच डीआरएस प्रणाली. डीआरएस प्रणालीचे पूर्ण नाव हे डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम असे आहे. याव्यतिरिक्त या प्रणालीला यूडीआरएस असेही म्हटले जाते. ज्याचा अर्थ पंच डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम असा होतो.
जेव्हा कोणत्याही संघाच्या खेळाडूला असे वाटते की पंचांनी घेतलेला निर्णय चूकीचा आहे. तेव्हा तो खेळाडू डीआरएस प्रणालीचा वापर करू शकतो. परंतु खेळाडूला हा निर्णय १० सेकंदांच्या आत घ्यावा लागतो. नाहीतर त्याला या प्रणालीचा फायदा घेता येत नाही. डीआरएस घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट पहावी लागते.
जर निर्णयादरम्यान तिसऱ्या पंचांना असे वाटले की खेळाडू बाद झालेला नाही, तेव्हा अशा परिस्थितीत तिसरे पंच निर्णय बदलू शकतात. त्यावेळी पहिल्या पंचांचा निर्णय जर योग्य ठरला तर त्यांचा निर्णय कायम समजला जातो.
आयसीसीच्या नियमानुसार प्रत्येक संघ डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमचा केवळ २ वेळा वापर करू शकतो. तसेच जर पंचांचा निर्णय असेल तर संघाला आपला डीआरएस पुन्हा मिळतो.
ईएसपीएन क्रिकइंफोनुुसार, २८ सप्टेंबर २०१८ पासून आतापर्यंत सर्व संघांनी एकूण ११४१ वेळा डीआरएस प्रणालीचा वापर केला आहे. ज्यामध्ये फक्त ३२५ प्रकरणांमध्येच संघांचा निर्णय योग्य राहिला आहे. आज या लेखात आपण सर्व संघानी घेतलेल्या योग्य डीआरएस प्रणालीची आकडेवारी पाहणार आहोत.
डीआरएस प्रणालीचा सर्वाधिक चांगला वापर करणारे देश-
९. श्रीलंका-
डीआरएस प्रणालीचा चांगला वापर करणाऱ्या देशांच्या यादीत श्रीलंका (Sri Lanka) नवव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने आतापर्यंत डीआरएस प्रणालीचा २३.३ टक्के योग्य निर्णय घेतला आहे.
८. दक्षिण आफ्रिका-
दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने आतापर्यंत ११८ वेळा डीआरएस (DRS) प्रणालीचा वापर केला आहे. यामध्ये योग्य निर्णय घेण्यात ते २५.४ टक्के यशस्वी झाले आहेत.
७. ऑस्ट्रेलिया-
जागतिक दर्जाचा समजला जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. परंतु डीआरएसचा योग्य वापर करणाऱ्या संघांच्या यादीत ऑस्ट्रेलियाला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
ऑस्ट्रेलियाने (Australia) डीआरएस प्रणालीचा आतापर्यंत २६.६ टक्के योग्य निर्णय घेतला आहे.
६. भारत-
भारतीय संघाला जागतिक दर्जाच्या संघांपैकी एक समजले जाते. भारतीय (India) संघ सर्वाधिक चांगला डीआरएस प्रणालीचा वापर करणाऱ्या संघाच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने आतापर्यंत १४८ वेळा डीआरएस प्रणालीचा वापर केला आहे. यामध्ये भारतीय संघाने २७ टक्के योग्य निर्णय घेतला आहे.
५. न्यूझीलंड-
न्यूझीलंड (New Zealand) संघाने आतापर्यंत डीआरएस प्रणालीचा २८.४ टक्के योग्य निर्णय घेतला आहे.
४. बांगलादेश-
युवा फलंदाजांचा समजला जाणारा संघ म्हणजेच बांगलादेश संघ. बांगलादेशने (Bangladesh) आतापर्यंत डीआरएस प्रणालीचा ३० टक्के योग्य निर्णय घेतला आहे.
३. वेस्ट इंडीज-
वेस्ट इंडीज (West Indies) संघाने आतापर्यंत डीआरएस प्रणालीचा ३०.३ टक्के योग्य निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त वेस्ट इंडीज संघाने २ वेळा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.
२. इंग्लंड-
जगाला क्रिकेट देणारा इंग्लंड (England) संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत घेतलेल्या डीआरएस प्रणालीचा निर्णय ३२.४ टक्के योग्य घेतला आहे.
१. पाकिस्तान-
पाकिस्तान (Pakistan) संघाने आतापर्यंत डीआरएस प्रणालीचा निर्णय ३४. ६ टक्के योग्य घेतला आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान संघ आयसीसी टी२० रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एमएस धोनी, विराट व रोहितसह १८९ खेळाडू संकटात
-टीम पेनची बडबड झाली सुरु, किंग कोहलीच्या टीम इंडियाला दिले मोठे टेन्शन
-१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम