---Advertisement---

ब्रेकिंग बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, या 15 खेळाडूंना संघात स्थान

On: मंगळवार, ऑगस्ट 27, 2024 12:39 PM
indian Womens Team
---Advertisement---

आगमी महिला आयसीसी टी20 विश्वचषक ऑक्टोंबरमध्ये खेळवली जाणार आहे. बांग्लादेशमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र बांग्लादेश येथील हिंसाचार आणि अंदोलान पाहता यंदाचे महिला टी20 विश्वचषकाचे आयोजन यूएई येथे करण्यात आले आहे. ज्यासाठी आता बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

भारताने महिला टी20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांचा टीम इंडियात समावेश आहे. राधा यादव आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनाही टीम इंडियात स्थान मिळाले आहे. महिला टी20 विश्वचषक 2024 ला 3 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडच्या संघाशी आहे. हा सामना 4 ऑक्टोबरला होणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे.

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन

राखीव खेळाडू – उमा छेत्री, तनुजा कंवर आणि सायमा ठाकोर

टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आलं आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. महिला टी20 विश्वचषक 2024चा पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. हा सामना (3 ऑक्टोबरला) शारजाहमध्ये खेळवला जाईल.

महिला टी20 विश्वचषकाच्या या स्पर्धेत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 4 गट सामने खेळणार आहे. या सामन्यांपूर्वी एकूण 10 सराव सामने खेळवले जाणार आहेत. टी20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना (17 ऑक्टोबर) रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. दुसरा उपांत्य सामना (18 ऑक्टोबर) रोजी शारजाह येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर (20 ऑक्टोबरला) दुबईत अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे वेळापत्रक

4 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
6 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
9 ऑक्टोबर- भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
13 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह

हेही वाचा-

ब्रेकिंग बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, या 15 खेळाडूंना संघात स्थान
गांगुली-धोनी नाही तर, हे दोन दिग्गज आवडीचे कर्णधार; स्टार क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
भारतीय सलामीवीर नव्या संघात दाखल; पुन्हा एकदा या स्पेशल लीगमध्ये दाखवणार आपली जादू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---