वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून सावरत आहे. फॉर्म परत मिळवण्यासाठी तो सध्या इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे. लँकेशायरकडून खेळताना त्याने केंटविरुद्ध दुसऱ्या डावात ३ बळी घेतले. यादरम्यान त्याने जॉर्डन कॉक्सला गोलंदाजी केली आणि त्याची दांडी हवेत उडवली. लँकेशायरने हा सामना १८४ धावांनी जिंकला. भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी केंटकडून खेळत असून त्याने पहिल्या डावात ३ बळीही घेतले होते. मात्र यां सामन्यात त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी लँकेशायरने दुसरा डाव ९ बाद ४३६ धावांवर घोषित केला. रॉब जोन्स ६५ धावांवर नाबाद राहिला. संघाने पहिल्या डावात १४५ धावा करत आघाडी घेतली, तर केंटने २७० धावा केल्या. अशाप्रकारे केंटला ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र दुसऱ्या डावात त्यांचे फलंदाज अपयशी ठरले आणि संपूर्ण संघ ५२.२ षटकात १२७ धावांवर गारद झाला. वेगवान गोलंदाज टॉम बेलीने सर्वाधिक ५ बळी घेतले. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने ३ बळी घेतले.
That is an incredible delivery from @Sundarwashi5 😲#LVCountyChamp pic.twitter.com/rLyMvMmI9l
— Vitality County Championship (@CountyChamp) July 28, 2022
८ खेळाडू दहाचा आकडा गाठू शकले नाहीत
केंटकडून दुसऱ्या डावात ८ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. डॅनियल ड्रमंड ६९ धावांवर नाबाद राहिला. ४ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या डावात १६ षटके टाकली आणि त्याला 5 मेडन्स होत्या. त्याने फक्त २४ धावा केल्या. पहिल्या डावात त्याने २२ षटकात ७५ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. मात्र दुसऱ्या डावात त्याने शानदार पुनरागमन केले. दुसरीकडे केंटकडून खेळणारा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने पहिल्या डावात १६ षटकांत ६३ धावांत ३ बळी घेतले. दुसऱ्या डावातही त्याला विकेट मिळाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आयपीएल’ला टक्कर देण्यासाठी ‘हा’ देश सज्ज! केली नव्या टी२० लीगची घोषणा
वेगाचा बादशहा थांबणार! फॉर्मुला वन चॅम्पियन वेटेलची निवृत्तीची घोषणा; भारताशी होते खास नाते