सध्या सुरु असेलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका संघाकडून सलग दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे झाले नाही आणि संघाला पराभव स्वीकारावे लागले. पण यादरम्यान भारताच्या एक फलंदाजाचे प्रदर्शन कौतुकास पात्र ठरले. तो फलंदाज म्हणजे, सलामीवीर इशान किशन. माजी दिग्गज गौतम गंभीरने याच कारणास्तव इशानचे कौतुक केले आणि त्याला विश्वचषक संघात कायम ठेवण्याची विनंती देखील केली.
गंभीरच्या मते सध्या विश्रांतीवर असेलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचे संघात पुनरागमन झाले, तरीदेखील इशान किशनला संघात ठेवले पाहिजे. माध्यमांशी बोलताना गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, “तो रोहित, राहुल आणि कोहलीच्या पुनरागमनानंतर देखील इशानला विश्वचषकाच्या संघात पाहू इच्छितो.’ गंभीरने प्रशिक्षक राहुल द्रविडकडेही विनंती केली की, ‘इशानला विश्वचषकाच्या संघात संधी मिळावी. तसेच पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही कायम ठेवले जावे,”
इशन किशन (Ishan Kishan) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये चमकार खेळी करू शकला. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ४८ चेंडूत ७६ धावा ठोकल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात तो २१ चेंडूत ३४ धावा करू शकला. त्याचे फलंदाजीतील निरंतर प्रदर्शन पाहून गंभीरप्रमाणेच इतरही दिग्गज प्रभावित झाल्याचे पाहिले गेले आहे. यावर्षी खेळला जाणारा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑट्रेलियातील परिस्थिती वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल असते. त्याठिकाणी चेंडूला अतिरिक्त उंची आणि वेग मिळतो. गंभीरच्या मते इशान अशा परिस्थितीत चांगली फलंदाजी करू शकतो.
तो म्हणाला की, “ऑस्ट्रेलियामध्ये खेळपट्टीवर उंची आणि वेग असतो. अशात इशानला बॅकफूटवर खेळायला आवडते आणि तो लेंथ बॉलला देखील चांगल्या प्रकार मारू शकतो. मला वाटते की, त्यांनी इशानला संधी दिली पाहिजे. इशान आणि रोहितने डावाची सुरुवात करावी आणि केएल राहुलने मध्यक्रमात खेळावे.”
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या मालिकेतून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी विश्रांती दिली गेली आहे. केएल राहुल या मालिकेत संघाचे नेतृत्व करणार होता, पण मालिका सुरू होण्यापूर्वी सराव करताना त्याला दुखापत झाली आणि तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला. रिषभ पंत सध्या संघाचे नेतृत्व करत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार पंतसह संघातील ‘या’ चार खेळाडूंनी केलंय निराश, पाहा कामगिरी
‘हार्दिक सध्याचा सर्वात वैविध्यपूर्ण खेळाडू’, भारताच्या माजी प्रशिक्षकाने केली पंड्याची प्रशंसा
कार्तिक करू शकतो, तर मी का नाही! ३३ वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाजाचा हुंकार