नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज या संघात नुकत्याच 3 सामन्यांच्या टी20 मालिका पार पडल्या. या मालिकेत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 3-0 असा तर न्यूझीलंडने वेस्ट इंडिडविरुद्ध 2-0 असा विजय मिळवला. या मालिकांनंतर आयसीसीने टी20 ची क्रमवारी जाहीर केली आहे.
इंग्लंड संघ आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयामुळे इंग्लंड आता आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत क्रमांक एकचा टी20 संघ बनला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानी होता. आता ऑस्ट्रेलिया दुसर्या क्रमांकावर घसरला असून भारतीय क्रिकेट संघ या क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर आहे.
आयसीसीच्या ताज्या टी20 संघक्रमवारीत भारतीय संघानंतर पाकिस्तान चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहे.
???? of the rankings! ????????????????????????????
England's clean sweep of South Africa has put them above Australia in the @MRFWorldwide ICC T20I Team Rankings ???????? pic.twitter.com/sN7ZyU9xw5
— ICC (@ICC) December 1, 2020
डेविड मालन टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी
आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान प्रथम क्रमांकावर आहे. दुसर्या क्रमांकावर बाबर आझम (पाकिस्तान), तिसऱ्या क्रमांकावर ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) आणि चौथ्या क्रमांकावर केएल राहुल (भारत) आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा रस्सी वॅन दर दसन पाचव्या क्रमांकावर आला आहे.
विराट कोहली टी20 क्रमवारीत 9 व्या स्थानी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत 9 व्या स्थानावर असून भारतीय सलामीवीर रोहित शर्मा 10 व्या क्रमांकावर आहे.
टी20 मध्ये गोलंदाजांच्या यादीत राशिद खान अव्वल
आयसीसी टी20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याच्या संघसहकारी मुजीब उर रहमान दुसर्या क्रमांकावर आहे. टी20 गोलंदाजांच्या क्रमवारीत 10 व्या स्थानापर्यंत कोणत्याही भारतीयांचा समावेश नाही.
मोहम्मद नबी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी पहिल्या क्रमांकावर तर बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसर्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या दहामध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या टी20 सामन्यात इंग्लंड विजयी
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्या टी20 सामन्यात. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत तीन बाद 191 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने 17.4 षटकांत हे लक्ष्य सहजपणे गाठले. डेविड मलानने नाबाद 99 धावा करून या विजयात मोलाची कामगिरी निभावली.
महत्त्वाच्या बातम्या –
विकेट घेतल्यानंतर शार्दुल ठाकूरचे जोरदार सेलिब्रेशन, हेन्रीक्सला दिली खुन्नस, पाहा व्हिडिओ
अरे व्वा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेला मुकूनही रोहितने केला ‘हा’ खास विक्रम
“आदर हवा असेल तर तो करायलाही शिका”, युवा गोलंदाजाचे आफ्रिदीला जोरदार प्रत्युत्तर





