2024 पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप झाला आहे. आता 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची तयारी सुरू होईल. तत्पूर्वी, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
वास्तविक, लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच ऑलिम्पिक संचालक निकोलो कॅम्प्रियानी यांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत चर्चा केली होती. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश का करण्यात आला?, हेही त्यांनी सांगितलं. “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे विराट कोहलीची लोकप्रियता…विराट कोहली ग्लोबल आयकॉन आहे”, असं निकोलो कॅम्प्रियानी म्हणाले.
ऑलिम्पिक संचालक निकोलो कॅम्प्रियानी म्हणाले की, “जगभरातील सुमारे 2.5 अब्ज लोक क्रिकेट पाहतात. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. याचं ऑलिम्पिकमध्ये स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे”. ते म्हणाले की, “आम्हाला अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचं आहे. विराट कोहली घ्या. तो सोशल मीडियावर जगातील तिसरा सर्वाधिक फॉलो केला जाणारा ॲथलीट आहे. लेब्रॉन जेम्स, टॉम ब्रॅडी आणि टायगर वुड्स यांच्यापेक्षा विराट कोहलीला जास्त लोक फॉलो करतात.”
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1900 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळलं गेलं होतं. पण त्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा एकच सामना खेळला गेला. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पुन्हा खेळलं गेलं नाही. आता तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतत आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशामुळे जगभरातील क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहेत. ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या सामवेशामुळे भारताच्या सुवर्ण पदक जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत.
हेही वाचा –
मोहम्मद सिराजच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, संपूर्ण कुटुंबासह खास पोस्ट शेअर करत दिली माहिती
मोठी बातमी! विराट-रोहित दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार, अन्य वरिष्ठ खेळाडूंनाही खेळण्यास सांगितलं
केन विल्यमसन कर्णधार नाही! भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर