आजपासूनच देशभरात भारताचा माजी कर्णधार एस एस धोनीचा 43 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. माहीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी बिहारमधील रांची येथे झाला. टी20 विश्वचषकाव्यतिरिक्त, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच माहीच्या कर्णधारपदाखाली टीम इंडिया टेस्ट फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनली. या व्यतीरिक्त आयपीएलमध्ये देखील धोनीची जादु पहायला मिळाली. चेन्नई सुपरकिंग्ज संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली 5 वेळा ट्राॅफी जिंकला आहे.
महेंद्रसिंग धोनीचा 100 फूट उंचीचा कट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, माहीच्या तेलुगू चाहत्यांनी कट आऊट केला आहे. या भव्य कट आऊटला सोशल मीडियावर बरेच प्रतिक्रिया मिळत आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
100 FEET CUT-OUT OF MS DHONI BY TELUGU FANS. 🥶
– Birthday celebration begins for Thala…!!!! pic.twitter.com/QatZw2Jb7Q
— Johns. (@CricCrazyJohns) July 6, 2024
महेंद्रसिंग धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय त्याने भारताकडून 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. महेंद्रसिंग धोनीने टेस्ट फॉरमॅटमध्ये भारतासाठी 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. तर वनडे फॉरमॅटमध्ये त्याने 87.56 च्या स्ट्राइक रेटने आणि 50.58 च्या सरासरीने 10773 धावा केल्या. तसेच, भारतासाठी टी20 सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने 126.13 च्या स्ट्राइक रेटने आणि 37.6 च्या सरासरीने 1617 धावा केल्या.
याशिवाय महेंद्रसिंग धोनीची गणना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. आयपीएलच्या 264 सामन्यांमध्ये माहीने 137.54 च्या स्ट्राईक रेटने आणि 39.13 च्या सरासरीने 5243 धावा केल्या. तसेच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
महत्तवाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील विश्वविजेत्या खेळाडूंना तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर
ईशान किशनने केला हार्दिकचा अनोख्या पध्दतीने अभिनंदन; गळाभेट घेत म्हणाला…
मुंबईत बनणार नवं क्रिकेट स्टेडियम, वानखेडे पेक्षा चारपट असेल आसन क्षमता!