नवी दिल्ली| तीन वेळा आयपीएल चॅम्पियन असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ अतिशय अनुभवी खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. त्यांच्याकडे अनेक युवा खेळाडू देखील आहेत ज्यांनी आपल्या कौशल्याने मने जिंकली आहेत. या युवा खेळाडूंना अद्याप आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
चेन्नई सुपरकिंग्जच्या पथकात असाच एक 23 वर्षीय खेळाडू आहे जो बोटांच्या टोकावर मोठमोठ्या फलंदाजांना नाचवतो. त्याच्या चेंडूंवर षटकार मारणे फार कठीण आहे आणि फिरकीपटू असूनही तो पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करतो.
आम्ही बोलत आहोत रवीश्रीनिवासन साई किशोर या खेळाडूबद्दल. हा डावखुरा फिरकीपटू तमिळनाडूसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.
आर साई किशोर याच्याकडे आहे प्रचंड कौशल्य
आयपीएल 2020 च्या लिलावात आर साई किशोर याला सीएसकेने खरेदी केले होते. हा डावखुरा गोलंदाज 17 प्रथम-श्रेणी सामने, 20 अ दर्जाचे सामने आणि 22 टी20 सामने खेळला आहे.
तिन्ही स्वरूपात त्याची कामगिरी जबरदस्त आहे. या गोलंदाजाच्या नावावर 48 प्रथम श्रेणी बळी आहेत. त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 42 बळी घेतले आहेत.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे फिरकीपटू असूनही त्याचा इकॉनॉमी दर फक्त 5.45 आहे. टी20 मध्ये त्याने 25 बळी घेतले आहेत.
साई किशोर कसा आला चर्चेत ?
तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये साई किशोरचे हे नाव प्रथमच चर्चेत आले. सन 2017 मध्ये डाव्या हाताच्या या फिरकी गोलंदाजाने सर्वाधिक 17 बळी घेतले. 2019 मध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 12 सामन्यांत 20 बळी घेतले आणि त्याचा इकॉनॉमी दर अवघा 4.63 होता.
पॉवरप्लेमध्ये त्याने 20 पैकी 15 बळी घेतले. त्यानंतर आयपीएलच्या संघांकडून त्याची दखल घेतली गेली.
धोनी-हरभजनने बनवले चांगले गोलंदाज
साई किशोरला चांगला गोलंदाज बनविण्यात धोनी आणि हरभजन सिंग यांचा मोठा वाटा आहे. आयपीएल 2019 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जच्या हंगामी शिबिरात गोलंदाजी करत होता.
पहिले दोन दिवस त्याने चांगली गोलंदाजी केली पण तिसर्या दिवशी धोनीने त्याचा चांगलाच समाचार घेतला. धोनीने त्याच्या प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर हरभजन सिंगने त्याला सांगितले की धोनीसारख्या फलंदाजाला चेंडू कसा फेकावा.
हरभजनने त्याला त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास सांगितले. साई किशोरनेही तसेच केले आणि काही दिवसांनंतर या गोलंदाजाने धोनीला एकही षटकार ठोकू दिला नाही. तो एक उत्तम गोलंदाज आहे, या हंगामात त्याला संधी मिळेल की नाही, हे पहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गजांशी तुलना होत असलेला हा खेळाडू प्रेमाच्या खेळपट्टीवरही ठोकतोय चौकार आणि षटकार?
हिटमॅन रोहित शर्मा चेंडू फक्त स्टेडियमबाहेरच पाठवत नाही, तर चालत्या बसवर मारतोय, पहा व्हिडिओ
आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकणार नाही मुंबई इंडियन्सचा हा फलंदाज; या दिग्गजांनी केलाय दावा
ट्रेंडिंग लेख –
भारताच्या १९ वर्षांखालील संघातील हे ३ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज, अंतिम अकरामध्ये स्थान निश्चित
असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट
…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला