भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासून जसप्रीत बुमराह विश्रांतीवर आहे. टी20 विश्वचषकाच्या यशामध्ये बुमराहचे मोलाचे यगदान होते. यास्पर्धेनंतर त्याला कोणत्याही मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले नाही. बुमराहने नुकतेच एक विधान केले होते, ज्यामुळे तो चर्चेत आला होता. आता पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने त्या वक्तव्यावर बुमराहला सल्ला देताना म्हटले आहे की, त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसारखा छंद जोपासू नको.
वास्तविक, बुमराहने नुकतेच कर्णधारपदाबद्दल बोलले होते. त्याने सांगितले होते की क्रिकेट जगतात वेगवान गोलंदाज कसे यशस्वी कर्णधार होते आणि त्यांनी आपापल्या संघासाठी चमत्कार केले. बुमराहच्या या वक्तव्यावर बासित अली म्हणाला की, बाबर आझमप्रमाणे कर्णधारपदाची आवड बाळगू नये. मात्र, पुढील वर्षी बुमराह टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो, असा अंदाजही बासित अलीने व्यक्त केला आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाला, “मी बुमराहच्या वक्तव्याकडे त्याच पद्धतीने पाहतो. ज्याप्रमाणे बाबर आझमला कर्णधारपदाची आवड आहे. बुमराहला कर्णधारपदाची आवड नसावी. तो ज्या स्तराचा गोलंदाज आहे, त्याला कर्णधारपदाची आवड नसावी. पण बुमराहने सांगितले की, ऑलराउंडर आणि बॉलरमध्ये फारसा फरक नाही, बुमराहने कपिल देव आणि वसीम अक्रम यांचा उल्लेख केला. कपिल देव आणि वसीम अक्रम अष्टपैलू बनल्यानंतर कर्णधारपदी यशस्वी झाले. जेव्हा तो गोलंदाज म्हणून संघात आला तेव्हा तो कर्णधार झाला नाही. अष्टपैलू आणि गोलंदाज यांच्यात खूप फरक आहे. फार कमी वेगवान गोलंदाज चांगले कर्णधार किंवा प्रशिक्षक असतात. बुमराहला माझ्या शुभेच्छा. कदाचित तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर कर्णधार होऊ शकेल. मी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभेच्छा देतो.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बुमराहने कर्णधारपदावर चर्चा केली. भारतीय वेगवान गोलंदाज म्हणाला, “गोलंदाजांना कठोर परिश्रम करावे लागतात. गोलंदाजाला बॅट किंवा सपाट विकेटच्या मागे लपून राहावे लागत नाही. गोलंदाज नेहमीच लक्ष्यावर असतो. जेव्हा आपण सामना गमावतो तेव्हा गोलंदाजांना दोष दिला जातो. त्यामुळे हे अवघड आहे. तुम्ही पॅट कमिन्सची कर्णधार म्हणून कामगिरी पाहिला असालच, मी लहान असताना वसीम अक्रम आणि वकार युनूस यांना कर्णधार म्हणून पाहिले. कपिल देव यांनी आम्हाला विश्वचषक जिंकून दिला. इम्रान खानने पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला. गोलंदाज नेहमीच हुशार असतात.”
हेही वाचा-
‘मी देशाचा सर्वोत्कृष्ट स्पिनर…’, गुजरातच्या स्टारचे बीसीसीआयला आव्हान?
धोनीनंतर आता युवराज सिंगवर बनणार बायोपिक, हा अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका!
नवा विश्वविक्रम! 1 ओव्हर 39 धावा, 6 षटकार; युवराज सिंगचा रेकाॅर्ड भांड्यात!